मुंबई गोवा हायवेवर पहेल फाटा येथे झालेल्या अपघातात माणगांव वडपले येथील महेश मोहीते याचा जागीच मृत्यू..

उपसंपादक-राकेश देशमुख
पहेल फाटा
अपघात ता. वेळ व ठिकाण :-



आज दि.27/03/2025 रोजी 14.15 वा पहेल फाटा येथे NH66 मुंबई-गोवा हायवे रोडवर.
- फेटल अपघात*
अपघातातील वाहन:-
1) अज्ञात वाहन क्रमांक –
नाव व गाडी क्रमांक माहिती नाही.
2) मोटार सायकल क्रमांक –
नवीन मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली.
मयताचे नाव :- महेश गणेश मोहिते वय 31 रा.वडपले ता माणगांव जि. रायगड
अपघातचे कारण-:-
वरील नमूद तारखेस, वेळी व ठिकाणी यातील मोटार सायकल स्वार महेश गणेश मोहिते वय- 31 रा. वडपाले ता. माणगांव जि. रायगड हा लोणेरे ते वडपाले असा प्रवास करीत असताना सुमारे 14.15 वाजण्याच्या सुमारास पहेल फाटा येथे आलेवेळी गोवा बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणारे अज्ञात वाहनाने मोटरसायकल सर यास ठोकर मारून निघून गेला आहे सदर अपघातामध्ये मोटर सायकल स्वार यास डोक्याला गंभीर दुखापत होऊन मयत झाला आहे त्यामध्ये तो जागीच मरण पावलेला आहे सदर अपघाताची खबर गोरेगाव पोलीस ठाणे यांना देण्यात आली असून घटनास्थळी गोरेगाव पोलीस ठाणे कडील स्टाफ हजर होता. सदर चालकाचे प्रेत पुढील कार्यवाही करिता ॲम्बुलन्स ने ग्रामीण हॉस्पिटल माणगाव येथे नेण्यात आलेले असून अपघातातील मोटरसायकल बाजूला करण्यात आलेला असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.
सदर घटनास्थळी महामार्ग मदत केंद्र महाड कडील अधिकारी व स्टाफ, गोरेगाव पोलीस ठाणे कडील स्टाफ हजर होती.