पन्हाळा पोलीसानी बेवारस व अनोळखी मयताचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना केली अटक..

सह संपादक – रणजित मस्के कोल्हापूर ;पन्हाळा पोलीस ठाणेगुन्हा रजि नं व कलम50/2025 भा.न्या.सं. 2023 चे कलम 103(1),238,3(5) प्रमाणेमाहिती कशी प्राप्त झालीपो.स.ई. कोंडुभैरी पो.हवा 1538 समीर मुल्ला यांनी तांत्रीक विश्लेषण व बातमीदारामार्फ़तकारवाई करणारे अधिकारी व अंमलदारमा. पोलीस अधीक्षक कोल्हापुर श्री महेंन्द्र पंडीत साो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग, कोल्हापुर श्री आप्पासो पवार यांचे मार्गदर्शनाखाली संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक पन्हाळा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश कोंडुभैरी पोलीस उप निरीक्षक, पो. हवा 1538 समीर मुल्ला, पोहेकॉ 446 पाटील, पोहेकाँ. 249। वायदंडे पो. अंमलदार 893 रविंद्र कांबळे, सर्व नेमणूक पन्हाळा पोलीस ठाणेनिष्पन्न आरोपी नाव पत्ता1) सागर धुळाप्पा बंडगर, वय-38 रा. मातंग गल्ली, मौजे खेबवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर2) शुभम खानु मेटकर. वय-24 रा. जरगवाडी मौजे महे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.3) कृष्णात शिंगाप्पा धनगर. वय-46 रा. धनगर गल्ली मौजे आडुर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.मयताचे नांव व पत्ता -प्रशांत पांडुरंग कसबले रा. देसाईवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर4) गोरख शिंगाप्पा धनगर. वय-52 रा.धनगर गल्ली मौजे आर्डर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.थोडक्यात हकिगतपन्हाळा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 22.01.2025 रोजी अंबुभाळ नावाचे परिसरात डोगर भागात कणेरी गांवचे हद्दीत पुरूष जातीचे अर्धवट सडलेल्या मयत स्थितीत मिळुन आलेने पन्हाळा पोलीस ठाणेकडे अ.म.र.नं. 04/2025 भा.ना.सु.सं.2023 चे कलम 194 प्रमाणे मयत दाखल झाले होते. त्याचा तपास पोसई श्री कोंडुभैरी हे करीत होते.सदर बाबत मा. पोलीस अधीक्षक साो कोल्हापूर यांनी सदरचे प्रेत कोणाचे आहे याचा तपास करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार मयताचे तपासा दरम्यान मयता जवळ पुसटसा मोबाईल क्रमांक असलेली एक कागदाची चिठ्ठी मिळुन आली. त्याचा तपास पोसई श्री कोंडुभैरी व पोहेकॉ 1538 समीर मुल्ला हे करीत असताना त्यांना सदर चिठ्ठीवरील नंबर वरून प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकावरून खात्री केली असता तो मोबाईल दुरूस्ती करणाऱ्या दुकानदाराचा असल्याचे आढळुन आले त्यावेळी त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी त्याच्याजवळ रिपेअरींग करीता आलेल्या मोबाईलबाबत माहिती घेतली असता एक मोबाईल दुकानदाराकडे बऱ्याच दिवसापासुन दुरूस्ती करीता पडुन होता व सदर मोबाईल धारकाने दुकानदाराच्या मोबाईल वरून त्याच्या मित्रास फोन केला होता. त्यानुसार त्याच्या मित्राकडे व नातेवाईकांकडे चौकशी केली असता सदर मोबाईल हा प्रशांत पांडुरंग कसबले रा. देसाईवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर याचा होता व तो मजुरी कामाकरीता कोल्हापूर येथे गेला असल्याचे समजले. तसेच बऱ्याच दिवसापासुन त्याच्याशी संपर्क झाला नसल्याचे सांगितले.त्यानंतर कोल्हापूर बस स्थानक येथे बाहेरून मजुरी करीता येणाऱ्या बाबत चौकशी केली असता काही मजुर पुरवणाऱ्या गाऱ्या इसमां इसमां बाबत माहिती घेतली असता मजुर पुरवणाऱ्यापैकी एकजण खेबवडे ता. करवीर जि. कोल्हापूर येथील असल्याचे समजले व इसम नामे प्रशांत कसबले याच्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणावरून खेबवडे हे ठिकाण निश्चीत झाल्याने सदर मजुर पुरवणारा इसम नामे सागर बंडगर रा. खेबवडे ता. करवीर जि. कोल्हापूर याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने इसम नामे प्रशांत पांडुरंग कसबले रा. चंदगड यास बकरे राखण्याच्या काम देतो असे सांगुन त्यास मौजे खेबवडे येथे घेवुन गेला होता. त्यानंतर त्यास मौजे महे ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील शुभम मेटकर याच्याकडे मजुर पुरविण्याच्या बदल्यात मोबादला घेवुन प्रशांत यास पाठविले होते. प्रशांत हा दोन दिवस तेथे काम करून पळुन गेला होता त्यास शुभम याने मध्यवर्ती बस स्थानक, कोल्हापूर येथुन परत आणुन त्यास काम सोडुन पळुन गेल्याच्या रागातुन लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर त्यास खेबवडे ता. करवीर येथे नेवुन आरोपी क्र.1 सागर बंडगर रा. खेबवडे याच्याकडे सोडले होते. त्यानंतर आरोपी क्र.। व आरोपी क्र.2 यांनी मयत प्रशांत पांडुरंग कसबले यास काम सोडुन पळुन गेल्याच्या रागातुन पुन्हा गंभीर मारहाण केली व त्यानंतर आरोपी क्र.। याने आरोपी क्र.3 व 4 यांचेकडे कामासपाठविलेनंतर त्यांच्याकडे कामास असताना तो गंभार जखमी असल्याचे माहित असुन देखील आरोपी क्र.3 व 4 यांनी त्याच्यावर कोणतेही उपचार न केल्यामुळे तो मयत झाला व मयत झाले नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणासही काहीही न सांगता मयतास आरोपी क्र. 3 व 4 यांनी आपलेकडील घोड्यावर प्रेत लादुन रात्रीच्या वेळेस मौजे कणेरी व करंजफेण या गावाच्या दरम्यानचे जंगल भागात डोंगर उतारावर नेवुन तेथे टाकले याबाबत सर्व आरोपींनी कबुली दिली आहे.सदर पुरूष जातीचे अनोळखी प्रेत पुर्णपणे कुजलेल्या स्थितीत मिळुन आल्यानंतर मयताची ओळख पटण्याची कोणतेही चिन्हे नसताना केवळ मयताच्या पँटचे खिशातील मिळुन आलेल्या चिठ्ठीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे मयताची ओळख पटवुन यातील आरोपी निष्पन्न करून सदरचा गुन्हा दोन महिन्यानंतर उघडकीस आणलेला आहे. सदर बाबत पन्हाळा पोलीस ठाणेकडील तपास पथकाने चंदगड तालुका, करवीर तालुका व कोल्हापूर शहर या ठिकाणी तपास केलेला आहे.मा. पोलीस अधीक्षक कोल्हापुर श्री महेंन्द्र पंडीत साो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग, कोल्हापुर श्री आप्पासो पवार यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास पथकातील पोसई महेश कोंडुभैरी, पो.हवा 1538 समिर मुल्ला, पोहेकॉ 446 पाटील, पोहेकाँ 249। वायदंडे, पोकों 893 रविंद्र कांबळे यांनी केलेली आहे. तसेच तांत्रीक विश्लेषण साठी सायबर पोलीस ठाणे पोनि श्री होडगर व पोसई म्हेत्रे व अंमलदार यांनी मदत केली आहे.