नागपूर येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने दंगाकाबू योजनेची रंगीत तालीम पालघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर राबविण्यात आली…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर ;



आज दि.22/03/2024 रोजी मा.सहा.पोलीस आयुक्त वसई विभाग,लोहमार्ग मुंबई यांच्या व पालघर रेल्वे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली, *दंगा काबू योजनेची रंगीत तालीम राबविन्यात आली .
सदरची दंगा काबु रंगीत तालीम पालघर रेल्वे स्टेशन येथे मेन गेटच्या बाहेर 10:40 वा ते 12:35 वाजेपर्यंत राबविण्यात आली.
सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालीम करीता पालघर रेल्वे पोलीस ठाणेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन इंगवले, 03 पोलीस अधिकारी, गोपनीय शाखेचे पो शि/832 श्याम भोईर,22 पोलीस अंमलदार, (यांच्याकडे लाटी ,हेल्मेट ,शील्ड , सिन गार्ड, गॅस गन ,06 शेल, स्ट्रेचर , 03 SLR , 01 बाराबोर रायफल, PA सिस्टीम ) RPF पालघर 02 कर्मचारी , पालघर शहर पोलीस ठाणे 03 पोलीस अंमलदार, 23 हमाल /रिक्षा चालक उपस्थितीत होते.
सदरची दंगा काबू योजनेची रंगीत तालीम परिणामकारक झालेली असून जमलेला जमाव पांगवण्याचा सराव करण्यात आला .