पोलीस अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कल्याण शाखेचे उद्घाटन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

कल्याण: मा श्री राहुल दुबाले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.श्री उमेश गोवर्धन भारती ( महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, ठाणे जिल्हा अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कल्याण शहरा मध्ये कल्याण शाखेचे रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असंख्य मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील साहेब, खडकपाडा पोलीस स्टेशन
सेवानिवृत्त डीसीपी श्री. माधवराव माळवे साहेब,
सेवानिवृत्त सीनिअर पी. आय. श्री. रघुनाथ घरटे साहेब,
शिवसेना कल्याण शहर अध्यक्ष श्री. रवी पाटील साहेब,
मनसे युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश नाईक साहेब,
मार्गदर्शक श्री. सुनील उत्तेकर साहेब,
तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक ,सेवानिवृत्त कल्याणकारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, राजकीय नेते मंडळी असे असंख्य मान्यवरांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित राहून यापुढे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरांत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वाढीसाठी संपूर्ण टीम एकनिष्ठ, संपूर्ण ताकदीनिशी काम करेल अशी ग्वाही दिली.

उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा टिमला मार्गदर्शन केले. यापुढे कशी कामे करता येतील यासंदर्भात उपस्थित वरिष्ठांनी योग्य ते मार्गदर्शन करून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

तसेच उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कल्याणकारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, राजकीय नेते मंडळी या सर्व मान्यवरांनी मा .श्री. उमेश गोवर्धन भारती यांनी कल्याण विभागात आमचे एक हक्काचे घर, न्यायालय दिले, अशा शब्दांत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा टीमला उपस्थित मान्यवरांनी खूप खूप शुभेच्छा देऊन सर्व पदाधिकारी, सदस्य यांना प्रोत्साहन दिले. आणि या कार्यक्रमाची सांगता शेवटी आपल्या भारत देशाची शान म्हणून राष्ट्रगीताने करण्यात आली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट