कांजूरमार्ग पोलीस ठाण्यामध्ये राबवण्यात आले आरोग्य शिबिर……

0
Spread the love

सह संपादक-रणजित मस्के

मुंबई

मुंबई पोलीस मुंबईकरांच्या सेवेसाठी 24 तास अहोरात्र उभे असतात, पोलिसांचे धावपळीचे जीवन त्यामध्ये कामाच्या वेळी ताण, तणाव तसेच वैयक्तिक आरोग्याकडे त्यांना लक्ष देखील देता येत नाही त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकता, म्हणूनच कांजूरमार्ग पोलीस स्टेशन मध्ये प्राथमिक आरोग्य शिबिर करण्याचा उपक्रम राबवण्यात आला, अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस व त्यांच्या कुटुंबासठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य शिबिराची मोफत तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 07 विजयकांत सागर यांच्या हस्ते झाले. सदर वेळी कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील, अपोलो हॉस्पिटलच्या डॉ रश्मी जाधव, तसेच अपोलो हॉस्पिटलचा वैद्यकीय स्टाफ, कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार तसेच हद्दीतील स्थानिक नागरिक, जेष्ठ नागरिक पुरुष व महिला देखील कांजूरमार्ग पोलीस स्टेशन मध्ये शिबिराचा लाभ घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट