नामांकित कंपनीला गंडा घालण्याच्या उद्देशाने फसवणूक केलेले ४० लाख रूपये पुणे सायबर पोलीसांना परत करण्यास आले यश..

पुणे
सह संपादक – रणजित मस्के
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील तक्रार अर्ज क्रमांक १७९/२०२५ यामध्ये नामांकीत कंपनीच्या अकाऊंट यांना सायबर गुन्हेगाराने अनोळखी गोबाईल क्रमांकावरून व्हॉटसअॅप मेसेज करून सदर कंपनीचे एम.डी. असल्याचे भासवुन ते एका मीटींग मध्ये असल्याचे व हा माझा पर्सनल मोबाईल क्रमांक असल्याचे सांगुन दुस-या कंपनीचे पेमेट वात्काळ करावयाचे आहे असे बतावणी करून कंपनीचे बँकखात्यामधुन त्यांनी व्हॉटसअॅप मेसेजद्वारे पाठविलेल्या बैंकखात्यामध्ये रक्कम ४०,९०,६०५/- रूपये पाठविण्यास सांगुन आर्थिक फसवणुक केली आहे म्हणुन सदरबाबत तक्रार नोंद आहे.
सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन परराज्यातील बँक खात्याबाबत पत्रव्यवहार करून तसेच सदरचे बँकखाते हे परराज्यातील असल्याने तेथील नोडल अधिकारी यांचे संपर्क साधुन वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांचे मदतीने फसवणुक झालेली रक्कम गोठविण्यात येवुन ती तक्रारदार यांना परत मिळवुन देण्यात सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना यश आले आहे.
सदरवी कामगिरी ही गा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, गा. पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर, श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर श्री. मच्छिंद्र खाडे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन श्रीमती स्वप्नाली शिंदे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तथा तपासी अधिकारी तुषार भोसले व पोलीस अंमलदार नवनाथ कोंडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे व सोनाली चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.
अशा प्रकारची सायबर फसवणुक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी
१. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज करून तुमचा बॉस किंवा जवळची व्यक्ती असल्याचे भासवुन पैशाची
मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवू नये.
२. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल करून तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज कावुन पैशाची मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याशिवाव पैसे पाठवु नये.