रेकॉर्डवरील आरोपी विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन, अवघ्या २४ तासात दोषारोपत्र मे. न्यायालयात दाखल केलेबाबत वानवडी पोलीसांवर होतोय कौतुकांचा वर्षाव..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

दिनांक १७/०३/२०२५ रोजी पिडीता यानी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे येवुन तक्रार दिली की, त्या त्यांचे होणा-या पतीसह दिनांक ०२/०३/२०२५ रोजी कोठारी व्हिल्स, रामटेकडी, सोलापुर रोड, पुणे वैथुन पायी घरी जात असताना आरोपी नामे राहुल संजय मिरेकर वय अंदाजे १९ वर्ष रा. मिरेकर वस्ती, रामटेकडी पुणे याने फिर्यादीला पाहुन अश्लिल शिव्या दिल्या तेव्हा फिर्यादीचा होणारा नवरा याने आरोपीस शिव्या देऊ नको असे म्हणाला असता आरोपीने त्यास देखिल शिवीगाळ करुन, हाताने मारहाण केली, तेव्हा फिर्यादी आरोपीपासुन तिचे नक्याला सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांचे केस पकडुन अश्लिल बोलल्याने फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न झाली होती. फिर्यादी यानी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक १७/०३/२०२५ रोजी आरोपी नामे राहुल संजय मिरेकर वय अंदाजे १९ वर्ष या रेकॉर्डवरील आरोपी विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे महीलेचा विनयभंग केलेबाबत वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.न.१२१/२०२५ भा. न्याय संहिता कलम ७४,७९,३५२,११५ (२) अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे तपासाकामी एक विशेष पथक तयार करुन, गुन्हयाचा तपास पुर्ण केला व गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी नाने राहुल संजय मिरेकर वय १९ वर्ष रा. मिरेकर वस्ती, रामटेकडी पुणे वास दाखल गुन्हयात तात्काळ अटक करुन, त्याचे विरुच्द आज दिनांक १८/०३/२०२५ रोजी अवघे २४ तासाचे आत दोषारोपपत्र मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो लष्कर कोर्ट पुणे शहर यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे त्याचा कोर्ट केस क्रमांक-३७२/२०२५ असा आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन श्री. सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, परि. पोलीस उपनिरीक्षक लोंढे सहा. पोलीस फौजदार साबळे सहा. पोलीस फौजदार बोबडे (पैरवी अधिकारी), पोलीस अंमलदार राजपुत, सलमान शेख व सीसीटीएनएस कडील महिला पोलीस अंमलदार शिंदे यानी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट