वानवडी पोलीसानीइन्स्टाग्रामवर न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी मागणा-या गुन्हेगारास केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :

पिडीत महिला यांचे अनोळखी इसमाने त्यांचे फोटो व नाव वापरुन इन्स्टाग्राम आयडी तयार करून त्याने फोटो व इन्स्टाग्राम आयडी डिलीट करण्यासाठी २,०००/-रु.ची मागणी केली. पैसे दिले नाहीतर फोटो मॉर्फीग केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. परंतु त्यास पैसे न दिल्याने त्याने फिर्यादी यांचे भावाचे इन्स्टा आयडीवर मॉफींग केलेले फिर्यादी यांचे न्युड फोटो पाठविले व आणखी फोटो पाठवयाचे नसेल तर इन्स्टाग्रामवर मॅसेस करुन पैशाची वारंवार मागणी केली म्हणून अनोळखी इसमांविरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.१०४/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ७७,७८,७९,३०८ (२). आय.टी अॅक्ट ६६ (सी), ६७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने तपास करुन वानवडी पोलीस ठाणे कडील सायबर टिम मधील पो. हवा. अमोल पिलाणे व अतुल गायकवाड यांनी त्याबाबत सोशल मिडीयावरुन माहिती प्राप्त करुन निष्पन्न आरोपी नामे रघुवर बलराम चौधरी, वय. १९ वर्षे, रा. अंबिका जनरल स्टोअर्स बाजूला, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे, मूळ बिहार यास निष्पन्न केले. त्याचा शोध घेऊन त्यास सोबतच्या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी करता तसेच त्याचे ताब्यातील मोबाईलची पाहणी करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि.१३/०३/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची दि. १७/०३/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडीचे रिमांड मंजूर आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव हे करीत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो.स्टे. पुणे शहर श्री. सत्यजित आदमाणे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव, पोलीस उप-निरीक्षक आशिष जाधव व पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर या विशेष पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट