काळेपडळ पोलीसानीविधीसंघर्षीत बालकाकडुन ४ दुचाकी व एक घरफोडी चोरी केल्याचे केले उघडकीस..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :

एकुण १,९२,०००/- रु.कि.चा मुद्देमाल केला हस्तगत.

काळेपडळ पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी यांची हिरो होंडा पेंशन प्रो ही मोटारसायकल दिनांक १४/०३/२०२५ रोजी कडनगर, उंड्री या ठिकाणी पार्क केली होती, दिनांक १५/०३/२०२५ रोजी फिर्यादी यांना त्यांची मोटारसायकल सदर ठिकाणी मिळुन आली नाही म्हणून काळेपडळ पोलीस ठाणे येथे त्यांची गाडी चोरी झाल्याची तक्रार देण्याकरीता आले होते. दरम्यान काळेपडळ पोलीस ठाणेकडील पेट्रोलिंग कर्तव्य करीता नेमण्यात आलेले पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे व विशाल ठोंबरे नमुद अंमलदार हे पहाटे ०४/३० ते ०५/०० वा. सुमारास कडनगर चौक नागात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम दुचाकी वाहन ढकलुन घेवून जाताना दिसला म्हणून बिट मार्शल अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी त्यास विचारपुस करीत असताना तो पळून जावु लागला असता बिट मार्शल अंमलदार वांनी त्याचा पाठलाग करुन शिताफिने त्यास पकडून वाहनासह पोलीस ठाणे येथे घेवून आले.

पोलीस ठाणे हद्दीत रात्रपाळी कर्तव्यावर नेमण्यात आलेले सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड यांनी त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता एक विचीसंघर्षित बालक वय १६ वर्षे याने सदरचे वाहन चोरी करुन घेवून जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांने वेगवेगळ्या तीन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

१) काळेपडळपोलीस ठाणे गु.र.नं.७१/२०२५भा.न्या. सं ३०३ (२) मधील हिरो होंडा पेंशन प्रो

२) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. २६६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील होंडा सीबी शाईन

३) वानवडी पोलीस ठाणे गु.रं.नं. ७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधीलकेटीएम २०० डयुकी

४) कोंढवा पोलीस ठाणे गु.रं.नं. ०७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील होंडा अॅक्टिवा ११०

५) काळेपडळ पोलीस ठाणे गु.रं.नं. २२/२०२५ ना.न्या.सं. कलम ३३१ (४). ३०५ एकुण ९,०००/- रु रोख रक्कम असा एकुण १,९२,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरीलप्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात आढळून आले आहे. विधीसंघर्षीत बालकाकडून वरील चारही वाहने व रोख रक्कम लपवुन ठेवलेल्या ठिकाणी जावुन ताब्यात घेण्यात आली आहेत. आरोपी विधीसंधर्षीत बालक हा चोरी केलेली वाहने घरफोडी व मौजमजा करण्यासाठी वापरत होता. पुढील अधिक तपास पोलीस अंमलदार प्रविण काळभोर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, श्री. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंगलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, पंचरकर, सद्दाम तांबोळी, दाऊद सय्यद, शाहिद शेख यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट