” जिद्द, मेहनत आणि यशाची विजयगाथा,दुर्गवाडी येथील कु संकेत सुनिल तांबे याची महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये निवड

0
WhatsApp Image 2025-03-16 at 9.25.18 PM (1)
Spread the love

राजापूर :

सुशिल तांबे :

 राजापूर तालुक्यातील कशेळी गावामधील दुर्गवाडी येथील कु संकेत सुनिल तांबे याची महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचे वाडीतील गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार यांच्या कडून अभिनंदन केले जातं आहे.

          लहान गावात राहून, कोणतंही विशेष मार्गदर्शन नसताना केवळ स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून तू जे यश तेमिळवलं आहेस, ते खरंच प्रेरणादायी आहे
  अडथळे येतातच, पण त्यांना पार करून पुढे जाणाऱ्यांचीच ओळख इतिहासात कोरली जाते.
तू न खचता, अपयशाला पायाखाली तुडवत उभा राहिलास आणि आज तुझ्या यशाचं ताटव फुललं आहे.

        तू केवळ तुझ्यासाठीच नाही, तर आजच्या तरुण पिढीसाठीही एक दीपस्तंभ आहेस — ध्येयपूर्तीसाठी कसं झगडावं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी न डगमगता यश मिळवायचं असतं, याचं तू जिवंत उदाहरण ठरलास.
“स्वप्न मोठं असलं, तरी त्याहून मोठी जिद्द असावी — मग यश  झुकून सलाम करेल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट