जालना शहरातील नॅशनल नगर भागात 09 धारधार तलवारी जप्तपोलीस ठाणे चंदनझिराची कार्यवाही..



सह संपादक- रणजित मस्के जालना ;आज दि. 13/03/2025 रोजी होळी धुलीवंदन सणा निमित्त पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथील पोलीस निरीक्षक श्री. सम्राटसिंग राजपुत यांच्या सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्ष सचिन सानप, एम.बी. स्कॉट, पोहेकों/तंगे, पोहेकों / जारवाल, नापोकों/राजु पवार, चालक पोकों/हिवाळे असे चंदनझिरा भागात पेट्रोलिंग करीत असताना सचिन सानप यांना त्यांच्या खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे खालेदबीन मोहम्मद बासर रा. कुचरवट्टा जुना जालना ह.मु. ग्रीन पार्क कॉलनी जालना हा त्याचे शाईन मोटारसायकल क्रमांक एम.एच.21.बी.सी.6178 वर धारधार तलवारी घेवुन डांगे नगर भागात, नॅशनल नगर रोडने जाणार आहे. आशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन सदरची माहिती मा.श्री. सम्राटसिंग राजपुत यांना देवुन त्यांचे सुचना व मार्गदर्शन प्रमाणे मिळालेल्या बातमी मधील इसम जाणारे रोडवर पोलीसांनी सापळा रचला सदर इसम हा त्याचे वरिल नमुद मोटारसायकलवर पोत्या मध्ये धारधार तलवारी मोटारसायकलला बांधुन डांगे नगर भागात, नॅशनल नगर कडे येत असताना दिसताच पोलीसांनी सदर इसमास झडप टाकुन पकडले त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्यांने त्याचे नांव खालेदबीन मोहम्मद बासर वय 45 वर्ष रा. कुचरवट्टा जुना जालना ह.मु.ग्रीन पार्क कॉलनी जालना असे सांगितले. त्याचे ताब्यातुन एकुण 09 धारधार तलवारी किमती 27000/- रुपयाच्या व होन्डा शाईन कंपनीची मोटारसायकल किंमती 20000/- रुपयाची असा एकुण 47000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सम्राटसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, एम. बी. स्कॉट, पोहेकों/कृष्णा तंगे, पोहेकों/गजाना जारवाल, नापोकों/राजेंद्र पवार, चालक पोकों/परमेश्वर हिवाळे यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ संतोष वनवे करत आहे.