विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर येथील सराईत चोरटा सिद्धार्थ गायकवाड विश्रामबाग पोलीसांच्या ताब्यात.

सह संपादक- रणजित मस्के पुणे ;चोरीच्या गुन्हयात अटक करुन १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं. ३९७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३, कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी है दिनांक २०/१२/२०२४ रोजी सायंकाळी ०७/०० ते ०७/३० दरम्यान मूलचंद मील बाजीराव रस्ता, बुधवार पेठ, पुणे येथे दुचाकी पार्क करत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या पायाला गाडीचा धक्का लागला आहे. असा वाद करून धक्का मारुन गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील खरेदीसाठी आणलेली ४८,०००/-रुपये रोख रक्कम संमती विना काढून घेतल्याने अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद आहे.दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, व पोलीस अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकातील पोलीस अंमल दार अनिस शेख व साताप्पा पाटील यांनी तांत्रीक विश्वलेषन व गोपणीय खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा हा सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २३ वर्षे, रा. आरणेश्वर आणाभाऊ साठे नगर पुणे याने केल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडुन ४८,०००/- रुपये रोख रक्कम व ७०,००० रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण १,१८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी हा दुचाकीस्वारास कट मारण्याचे कारणावरुन भांडण काढून धक्काबुक्की करुन खिशातुन पैसे काढुन गुन्हा करतो. तसेच आरोपीविरुध्द सहकारनगर पोलीस ठाणे, स्वारगेट पोलीस ठाणे येथे मारामारी व चोरीची गुन्हे नोंद आहेत.सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. प्रवीणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री. संदिपसिह गिल्ल, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पो.स्टे. श्रीमती विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अरुण घोडके, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिस शेख, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.