प्रेम संबंधात अडसर असलेल्या पतीला ठार मारणारा प्रेमी अक्षय जावळकर अखेर हडपसर पोलीसांच्या ताब्यात..

सह संपादक- रणजित मस्के

पुणे हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १८४८/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे १०३(१),१४० (१),१४०(२),१४०(३),१४२,२३८ (ब),६१ (२), ३ (५) या गुन्हयाचा करणेत आलेला तपास खालील प्रमाणे.१) दाखल गुन्हयामधील घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करणेत आलेला आहे.२) इसम नामे. सतिश सादबा वाघ यांची मयत बॉडी शिंदवणे घाटामध्ये मिळुन आल्याने दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम. १०३ (१), १४० (१) अन्वये कलम वाढ करण्यात करणेत आलेली आहे तसेच आरोपीतांनी संगनमत करुन, कट रचुन, पुरावे नष्ट केल्याने गुन्हयामध्ये भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ६१ (२), २३८ (ब) प्रमाणे कलम वाढ करण्यात आली.३) गुन्हयात मयत व आरोपी यांचे कडुन गुन्हयाचे अनुषंगाने जप्त केलेला संपुर्ण मुददेमाल तसेच गुन्हयात वापरलेले शेवरलेट कंपनीची कारची तपासणी करुन कारमध्ये मिळुन आलेले सॅम्पल मुददेमाल सी.ए. ला पाठविण्यात आला.४) गुन्हयातील आरोपीतांनी सुपारी स्वरुपात घेतलेल्या ४,५०,०००/- रक्कमेपैकी १,५६,०००/- रुपये जप्त करण्यात आले.५) आरोपीता कडुन मयत सतिश सादबा वाघ यांचा मोबाईल हॅण्डसेट जप्त करणेत आला.६) आरोपीने गुन्हयात वापरलेले हत्यार मिमा नदी पात्रामध्ये पेरणे पुल येथे फेकले असुन हत्यार फेकण्याकरीता वापरलेली व मयत सतिश वाघ यांची रेकी करण्याकरीता वापरलेली गाडी जप्त करणेत आली.७) आरोपींनी गुन्हा करण्यापुर्वी आलेल्या व गुन्हा केलेनंतर गेलेल्या मार्गावरील उपयुक्त १६ सी.सी.टी.व्ही. फुटेज जप्त करण्यात आली.८) नमुद गुन्हा आरोपीतांनी कसा घडवुन आणला याबाबत सविस्तर क्राईम सीन पंचनामा करणेत आलेला आहे.९) दाखल गुन्हयामधील महत्वाचे साक्षिदारांचा मा. न्यायालया समोर जबाब नोंदविण्यात आले.१०) अटक आरोपीतांविरुध्द १००० पानांचे दोषारोप पत्र भरुन मा. न्यायालयात दाखल करणेत आलेले असुन आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.नमुद गुन्हयातील मयत याची पत्नी मोहिनी वाघ व मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांचे मागील १० वर्षांपासुन असलेल्या अनैतिक प्रेम संबंधाला अडसर येत असल्याने आरोपी अक्षय जावळकर याने आरोपी मोहिनी वाघ हिचे सांगणेप्रमाणे गुन्हयाचा पुर्व नियोजित कट रचुन आरोपी नामे पवन शर्मा यास ५,००,०००/- रुपयाची सुपारी देवुन आरोपी पवन शर्मा याने त्याचे साथीदारांमार्फत मयत सतिश वाघ याचे अपहरण करुन धारदार शस्त्राने जीवानीशी ठार मारुन त्याचा खुन केला.