आळंदी म्हातोबाची या गावातील परिसरामध्ये अफु या अंमली पदार्थाची लागवड करणा-यावर लोणी काळभोर पोलीसांची कारवाई..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे ;दि.१४/०३/२०२५ रोजी दुपारी १५/०० वा. चे सुमारास आळंदी म्हातोबाची येथील, जगताप मळा रोड चे कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांचे प्लॉटींगचे मागील बाजुस असलेल्या जमीनीमध्ये अफु या अंमली पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने, पिक लागवड करण्यात आलेली आहे वगैरे मजकुरची गोपनिय खबर लोणी काळभोर पोलीसांना प्राप्त झाली.सदर प्राप्त खबरी नुसार लोणी काळभोर पोलीसांनी दोन पंचांसह घटनास्थळी जावुन छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान, आळंदी म्हातोबाची येथील गट नंबर ७७५ मध्ये एकुण ४०,०००/-रुपये किंमतीचे, व ४ किलोग्रॅम वजनाचे, ६६ अफु चे झाडे मिळून आले आहेत. सदरची आफु ची झाडे दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन ती जप्त करणेत आलेली आहेत. तसेच त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जमीन मालक महिला नामे मंगल दादासो जवळकर वय ४५ वर्षे रा.अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची ता. हवेली, जि.पुणे हिचे विरुध्द एन.डी.पी. एस. अॅक्ट क. ८. ब.१८ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असुन सदर महिला आरोपीस ताब्यात घेणेत आले आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाचव, पो. हवा क्षिरसागर, वणवे, सातपुते, पो. अमंलदार कटके, कुदळे, नानापुरे, तेलंगे म. पो. अमंलदार निकंबे, यादव, यांनी केलेली आहे.लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे आफु ची लागवड करणा-या लोकांविरुध्द यापुर्वीदेखील २ वेळा गुन्हे दाखल करुन कारवाई करणेत आलेली आहे. अशा प्रकारचे अवैध धंदे करणा-या इसमांवर लोणी काळभोर पोलीसांचे वतीने कायदेशीर कारवाइ ‘करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट