लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोक्सो बलात्काराचे गुन्हयात आरोपी सचिन अशोक खराडे यास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा..!

सह संपादक- रणजित मस्के
पुणे :गुन्हयाची हकिकत :-लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील गु. र. नं. ८५५/२०१७ भां.दं.वि.क. ४५२, ३५४, ३७६ (२) (आय) पोक्सो ३ (ब). ४. ५ (एम), ६, ८ मधील आरोपी नवनाथ अशोक खराडे वय २६. उरुळी कांचन, तुपे वस्ती, मुळ गाव भोगेवाडी, ता. म्हाडा, जि. सोलापुर याने दि. ०३/१२/२०२७ रोजी दुपारी ०३/३० वा. चे सुमारास उरुळी कांचन, तुपे वस्ती, संभाजी तुपे यांची चाळ, खोली नंबर १, ता. हवेली, जि. पुणे येथे दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची मुलगी (निर्भया) ही घरामध्ये भांडी ध्रुवत असताना आरोपीने फिर्यादी यांचे घरामध्ये घुसुन फिर्यादी यांचे मुलीस (निर्भया) घट्ट पकडुन तीचेशी तीचे इच्छेविरुध्द जबरीने शरिरसंबंध केले. सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस वरिलप्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला होता.तपास :-सदर गुन्हयाचा सहा. पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत इंगवले यांनी केला व आरोपीविरुध्द विहीत मुदतीत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याचा स्पेशल सेशन केस नंबर १०१/२०१८ असो आहे.शिक्षा :-सदर केसमध्ये आरोपीस सबळ पुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दि. १५/०३/२०२५ रोजी भा.दं.वि.क. ३५४ मध्ये १ वर्षे कारावास व ५०००/- रुपये दंड, भा.दं.वि.क. ४५२ मध्ये ५ वर्षे सश्रम कारावास व १०,०००/- रुपये दंड तसेच पोक्सो कायदा कलम ६ अन्वये १० वर्षे कारावास व १०,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.कामगिरी :-सरकारी पक्षातर्फे सरकारी वकिल श्री नितीन कोंघे, कोर्ट पैरवी श्रीमती ललीता कानवडे, लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी कामकाज पाहिले आहे. सदर कारमगिरीकरीता प्रोत्साहन म्हणुन डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से.) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पो. हया. २१४८ ललीता कानवडे व नमुद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि श्री श्रीकांत इंगवले यांना १०,०००/- रुपये बक्षीस मंजुर केले आहे.मागील २ महिन्यांचे कालावधीत लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील एकुण ५ गुन्हयांत दोषसिध्दी झालेली आहे.आदरणीय सर,*Conviction report* दि 15/03/2025 ➡️पोलीस स्टेशन – लोणीकाळभोर➡️गुन्हा रजि क्रं :- 855/17 भा.द. वी. कलम 452,354,376(2)सह POCSO 3(B),4,5(M),6,8➡️आरोपी- 1) नवनाथ अशोक खराडे वय 26 रा. उरलीकांचन जि. पुणे ➡️कोर्टाचे नांव :- सेशन कोर्ट,शिवाजीनगर ,पुणे➡️*तपासी अधिकारी*- श्री .श्रीकांत इंगवले API लोणीकाळभोर पोलिस ठाणे ➡️*शिक्षा*- IPC 354 खाली 1 वर्ष कारावास व 5 हजार रु दंड IPC 452 खाली 5 वर्ष कारावास व 10 हजार रू दंड POCSO कलम 6 अन्वये 10वर्ष व 10 हजार रू दंड