गोरेगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सन्मा. श्री .सागर शिवलकर राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..!

0
WhatsApp Image 2025-03-12 at 7.20.40 AM (1)
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई ;


आपल्या पोलीस अभिलेखावरील अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोरेगाव तीन डोंगरी पोलीस ठाण्याचे सन्मानिय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सागर शिवलकर हे सुरक्षा पोलीस टाइम्सच्या राजा शिवछत्रपती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी या पुरस्काराच्या साक्षीदार आमच्या पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मराठे मॅडम देखील उपस्थित होत्या. 

८ मार्च २०२५ रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना सन्मानचिन्ह म्हणून राजा शिव छत्रपतींची मुर्ती व प्रशंसनीय पत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच पोलीस ठाण्यातील संपुर्ण महिला पोलीस भगिनींना व पोलीस बांधवाना महिला दिनाच्या पुष्पगुच्छांसह शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या संपुर्ण टीमचे गोरेगाव तीन डोंगरी पोलीसांकडून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्रीमती सोनल शिंदे , प्रतिनिधी श्रीमती रेखा पांचाळ ,सानिका लाखन , सरिता वर्मा , करुणा शिंदे, अनिता पटेल , विनोदीने विचारे , अंकिता गुरव , छाया भारती , श्री. संजय शिंदे , नितीन खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

८ मार्च २०२५ हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदीआनंद वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट