महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान व पीसकीपर्स वेलफेयर फाउंडेशनचे वतीने प्रमाण पत्र वाटप..

उपसंपादक- उमेद सुतार
पुणे ;
पुणे पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चूल मूल सांभाळत त्यांना पोलीस कर्तव्यही पार पाडावे लागते. यामुळे त्यांना तारेवरची कसरत करत जीवन जगावे लागत असतानाही अनेक महिला पोलीस कर्मचारी यशस्वीरित्या हा सर्व कारभार सांभाळत आहेत. या सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे म्हणजे तो आपल्याला मोठा मान आहे असे संस्थापक अध्यक्ष उमेद सुथार यांनी यावेळी सांगितले.





जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना शान्तीरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र यांनीही नादेंङ सिटी पोलीस स्टेशन आणि सिंहगढ रोड वाहतूक विभाग मध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नादेंङ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अतुल बोस,सिंहगढ रोड वाहतूक विभाग चे सहायक पोलीस निरिक्षक राजकुमार बरडे,शान्तीरक्षक कल्याण संस्थानचे पुणे जिल्हा सलाहकार (पोलीस सेवा निवृत्त PI) नंदकुमार शेळके चे मार्गदर्शनखाली, पुणे शहर सचिव शेखर पवार, पुणे जिल्हा लेखापरीक्षक अर्जुनलाल, पुणे जिल्हा सभासद जगदीश हलकूडे, मोतीलाल,संतोष उमाटे , वैभव शृंगारपुरे,आदी उपस्थित होते.