पॉलीकॅप विद्युत वितरण कंपनीचे नव्याने उभारलेले इलेक्ट्रिक लोखंडी पोल गॅस कटरने कापून चोरी करणारी टोळी नागपूर वरून जेरबंद.

0
Spread the love

सह संपादक-रणजित मस्के

गोंदिया :*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची भरीव कामगिरी -* *पोलीस ठाणे तिरोडा येथील दाखल दोन गुन्ह्याची उकल…. तपासात गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करणारे तसेच आणखी लोखंडी पोल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता* – *इलेक्ट्रिक लोखंडी पोल चोरटे आरोपी नामे-* 1) बसंतलाल चुनबाद साहु, वय. 34 वर्ष रा बिनाकी, मंगळवारी, नागपूर, 2) अशिषकुमार देवीदयाल साहु, वय 28 वर्ष, रा. पाचमंदीर चौक, बानलाल चौक, नागपूर, 3) सुंदरलाल गुड्डु साहु, वय 28 वर्ष, रा. शनी मंदीर कलमना, नागपुर अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नागपूर येथून ताब्यात घेऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.. ⏩. याबाबत थोडक्यात प्रकरण अशाप्रकारे आहे की, दिनांक 06/11/2024 ला पॉलीकॅप इंडीया लिमीटेड मुंबई या कंपनी कडुन ठेकेदार पध्दतीने इलेक्ट्रीक पोल मौजा- बिर्सी (नायरा पेट्रोल पंप जवळ) ते मेंढा रोड या रस्त्याच्या बाजुला 16 इलेक्ट्रीक पोल आर. डी.एस.एस. प्रोजेक्ट चे पोल उभारण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार नामे प्रतापसिंह ठाकूर यांचे सुपरवायजर नामे- अमरकंठ झेलकर रा. रोहा, ता. मोहाडी जिल्हा भंडारा, यांनी दिनांक 07/01/2025 व दिनांक 08/01/2025 ला सांयकाळी कामाची पाहणी केली असता गाडलेले 16 लोखंडी पोल पैकी 15 पोल किंमती 1,25,000/- रु चे गॅस कटरने कापुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे कळविल्याने प्रत्यक्ष पाहणी करून फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पो ठाणे तिरोडा येथे अपराध क्र. 60/2025 कलम 303(2) भा.न्या.स. 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून तपासात आहे.. सदर गुन्ह्याचे मोडस नुसार तिरोडा हद्दीत अश्याच प्रकारे आणखी पोल चोरीची घटना घडल्याने गुन्हा क्र. 113/2025 प्रमाणे दाखल असल्याने नमूद गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत होते……पोलीस पथक यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सदर प्रकरणाचा संपुर्ण घटनाक्रम जाणून घेतला.. प्राप्त गोपनीय माहिती…, CCTV footage, अशा प्रकारचे चोरी करणारे आरोपींची इत्यंभूत माहिती प्राप्त करून त्यांचे तांत्रीक विश्लेषण वरून नमूद गुन्ह्यात नमूद आरोपींचा सहभाग असल्याचे संशयावरून आरोपींचा माग काढून आरोपी यांच्या मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून *आरोपी नामे* 1) बसंतलाल चुनबाद साहु, रा. नागपूर, 2) अशिषकुमार देवीदयाल साहु, रा. नागपूर, 3) सुंदरलाल गुड्डु साहु, रा. नागपूर, यांना नागपूर येथुन गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेण्यात आले…. जेरबंद करण्यात आलेल्या तिन्ही आरोपी यांना गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस , चौकशी केली असता नमूद आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे… आरोपीतांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या इलेक्टीक पोल चे 43 नग लहान मोठे आकाराचे तुकडे किंमती 1,92,715/- रुपये 2) एक निळया व लाल रंगाचा इंडीयन कंपनीचा गॅस सिलेंडर अंदाजे किंमती 4000/- रुपये3) एक लोखंडी ऑक्सीजन सिलेंडर अंदाजे किंमती 12,000/- रुपये4) एक लाल व निळ्या रंगाचा गॅस कटर पाईप नोजलसह अंदाजे किंमती 2000/- रुपये 4) एक टाटा कंपनीचा जुना वापरता ट्रक क्रमांक एमएच 12 एफ.झेड. 3671 किंमती अंदाजे 12 लाख /- रुपये , एक मोबाईल हँडसेट असा एकुण किंमती 14 लाख 20हजार 750/व रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे… आरोपींना पोलीस ठाणे तिरोडा पोलिसांचे स्वाधिन करण्यात आले असून पुढील सखोल तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.🕹️. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक- मपोउपनि वनिता सायकर, अंमलदार पोहवा तुलसीदास लूटे, विठ्ठल ठाकरे, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी केलेली असून गुन्हा उघड करण्याकरिता हंसराज भंडारकर , योगेश रहीले, रोशन येरणे, संजय मारवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट