माजी नगरसेवक लोकेश यादव गोळीबारात ठार मारण्याचा कट रचणाऱ्या मुख्य आरोपी- प्रशांत मेश्राम याच्या आणखी ६ साथीदारांना गुन्ह्यात पिस्तोल सह केली अटक..

सह संपादक- रणजित मस्के गोंदिया :*
गोंदिया शहर पोलीसांची कारवाई* याबाबत माहिती अशी की, घटना दि. 11/01/2024 रोजी चे सकाळी 11.00 वा. सुमारास लोकेश ऊर्फ कल्लु सुंदरलाल यादव, वय 42 वर्षे रा. यादव चौक गोंदिया यांना दोन अनोळखी आरोपीतांनी संगणमत करुन कोणत्यातरी बंदुकीने गोळी मारुन गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्याने तक्रारदार श्री. लक्की यादव, रा. बाराखोली, सिंधी कॉलोनी गोंदिया यांच्या तक्रारीवरुन दि. 11/1/2024 रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे अप.क्र. 11/2024 क.307,34 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल असून तपासात आहे… सदरचा गुन्हा नोंद होताच सदर गुन्हयात जखमीवर गोळी झाडणाऱ्यांसह त्यांना गुन्हयात मदत करणारे असे एकुण 9 आरोपीतांना यापूर्वी अटक करुन गुन्हयात वापरलेली देशी बनावटीची पिस्टल राऊंड सह हस्तगत करण्यात आली होती…..परंतु गुन्हयाचा मुख्य सुत्रधार प्रशांत उत्तम मेश्राम रा. भिमनगर गोंदिया हा घटना घडल्यापासुन फरार होता. त्यास दि. 04/03/2028 रोजी पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीद्वारे अटक करण्यात आलेली. असून त्याचा पोलीस कोठडी रीमांड घेवून त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपास चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्ह्यात त्याचेसोबत आणखी *सहभागी आरोपी नामे -* 1) निखलेश ऊर्फ निगम प्रकाश मेश्राम, वय 24 वर्षे, रा. फुलचुर पेठ, गोंदिया, 2) हर्ष अभय गजभीये, वय 22 वर्षे, रा. बाजपेयी चौक, कुंभारटोली गोंदिया, 3) उत्तम दुलीचंद गेडाम, वय 50 वर्षे, रा. कुंभारटोली गोंदिया यांना दि. 05/03/25 रोजी तसेच आरोपी क्रमांक – 4) चेतेश ऊर्फ चेतु धनराज कटरे, वय 30 वर्षे, रा. फुलचुर पेठ, आय.टी.आय. जवळ गोंदिया यास दि. 06/03/2025 रोजी गुन्हयात वेगवेगळया ठिकाणा वरून कोंबिंग ऑपरेशन राबवून अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींचा गुन्हयात वापरलेले हत्यार पुरविण्यात महत्त्वाचा सहभाग होता. त्याचप्रमाणे गुन्हयातील अटक आरोपीतांनी दिलेल्या माहितीवरून दि. 07/03/2025 रोजी आरोपी चेतेश ऊर्फ चेतु धनराज कटरे रा. फुलचुर पेठ, गोंदिया याच्या घराची झडती घेतली असता घरझडतीमध्ये एक देशी बनावटीची पिस्टल (कट्टा)मिळून आली आहे. आरोपी चेतु कटरे याचेवर यापुर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदर पिस्टल गुन्हयामध्ये रितसर जप्ती करण्यात आलेली आहे…..तसेच तपासादरम्यान सदर गुन्हयात आरोपी नामे- 5) कुलदीप भादु खरवडे, वय 40 वर्षे, मनझारा जि. बालाघाट (म.प्र.) आणि 6) खिलेंद्र हिरासिंग धुर्वे, वय 36 वर्षे, रा. टेकाडी शिरपुर जि. बालाघाट (म.प्र.) यांनी सदर देशी बनावटीची पिस्टल पुरविल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सुध्दा दि. 07/03/2025 रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे….यातील आरोपी खिलेंद्र धुर्वे याचेवर पोलीस स्टेशन बालाघाट येथे सुध्दा देशी बनावटीची पिस्टल पुरवील्याबाबत यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपी हे दिनांक 10/03/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रीमांड मध्ये आहेत.🕹️ अशाप्रकारे गुन्हयातील फरार आरोपी प्रशांत मेश्राम यास अटक होताच नवनवीन बाबींचा उलगडा होवून अगोदर अटक केलेल्या आरोपीतां व्यतीरीक्त त्याच्यासह पुन्हा इतर नवीन 6 आरोपीतांना गोंदिया शहर पोलीसांनी अटक केली आहे….. सदर गुन्हयात पोलीसांनी आतापर्यंत एकुण 16 आरोपीतांना अटक करुन त्यांच्याकडुन देशी बनावटीच्या दोन पिस्टल व 3 काडतुस तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करुन प्रशंसनीय कामगीरी केलेली आहे… सदर गुन्हयाचा गोंदिया शहर पोलीस बुध्दी कौशल्य तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर वेगवेगळया दृष्टीकोणातुन तपास करीत असुन गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हयाचे मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार श्री. किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. गोदिया शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. वैभव गेडाम, सहायक पोलीस निरीक्षक, गोंदिया शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.सदरची कामगीरी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते, सह.पो.नि. श्री. वैभव गेडाम, पोउपनि थेर, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, प्रमोद चव्हाण, सतिश शेंडे, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, दिपक राहांगडाले, पोशि. सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश इंदुरकर, सनोज सपाटे तसेच एसडीपीओ कार्या. येथील पो.हवा. पठाण, अंबरवाडे, कनोजे पो.शि. लोकेश यादव, मपोशि अंजु नागपुरे यांनी केली आहे.