परिमंडळ ५ मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त महिला पोलीसांची भव्य बाईक रॅली…!

सह संपादक- रणजित मस्के


पुणे ;बेटी बचाओ … बेटी पढाओ (BBBP) या उपक्रमाला दिनांक २२/०१/२०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमीत्ताने ८ मार्च जागतिक महिला दिनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीसांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने परिमंडळ ५ मधील महिला पोलीसांच्या वतीने दिनांक ०८/०३/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता महात्मा फुले सांस्कृतीक भवन, वानवडी ते एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर असे महिला पोलीस वाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.परिमंडळ ५ मधील २३२ महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ११६ मोटार सायकलींवर स्वार होऊन बाईक रॅलीमध्ये यथेच्छ सहभाग घेतला होता. सदर बाईक रॅलीस सिनेअभिनेता पुष्कर जोग, संगिता तरडे व प्राजक्ता गायकवाड यांनी महात्मा फुले सांस्कृतीक भवन, बानबडी येथे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली होती. सदर बाईक रॅली एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे समाप्त झाली आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ ५ मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावतीने करण्यात आले होते.”जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”