हडपसर पोलीसानी नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाइन सल्फेट (टींन) इंन्जेक्शनची बेकायदेशिरपणे विक्री करणा-या २ केली अटक..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

अंदाजे १,००,०००/- किंमतीच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) च्या १९०
बाटल्या केल्या जप्त

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संजय मोगले, आणि पोतीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०९/०३/२०२५ रोजी तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक सत्यवान गेंड पोलीस अंमलदार दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महावीर लोंढे, चंद्रकांत रेजिवाड, असे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, मिळालेल्या गोपनीय बातमीवरून छापा कारवाई करून संशयीत १) योगेश सुरेश राउत वय २५ वर्षे रा.रा. घुलेवस्ती हाईटस मोरेवस्ती मांजरी बु. हडपसर पुणे व २) निसार चाँद शेख वय २३ वर्षे रा.१५ नं घाडगे गल्ली शेख चाळ हडपसर पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांचे कडून एकूण ६० MA PHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. त्याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता, सदरचे औषध हे नशा करण्यासाठी असून त्याची विक्री करत असल्याचे सांगितले.

आरोपी १) योगेश सुरेश राउत व २) निसार चाँद शेख यांचेकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणा-या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होवु शकते हे माहित असताना सुध्दा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्री करिता आपले कब्जात घेवुन मिळून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं २८२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२७५,२७८,१२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी १) योगेश सुरेश राउत २) निसार चाँद शेख यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांचेकडे केले कौशल्यपुर्ण तपासात MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या आणखी १३० बॉटल्स या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडून आज रोजी पर्यंत एकूण १९० MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या त्याची बाजार भावानुसार अंदाजे किंमत १,००,०००/- इतकी आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, हे करीत आहेत.

तसेच नागरिकांना अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशिर कृत्यांबाबत माहीती मिळाल्यास पुढील क्रमांका वरती संपर्क साधावा. १) वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, मो. नं ९२८४३६८१२९ २) पोलीस उप निरीक्षक सत्यवान गैंड, मो. नं ९११९४४७८७१

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, यांचे सुवनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोंढे, महेश चव्हाण, बापु लोणकर, यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट