स्वारगेट बस स्टॅन्ड येथील लॅपटॉप चोर लियाकत शेख स्वारगेट पोलीसांनकडुन जेरबंद ..

सह संपादक- रणजित मस्के पुणेदिनांक ०८/०३/२०२५ रोजी सकाळी ०५/३० वाजाताच्या सुमारास स्वारगेट बस स्टॅन्ड येथुन दोन वेगवेगळ्या बसमधुन अज्ञात इसमाने दोन लॉपटॉप चोरी करुन नेहले म्हणुन स्वारगेट पोलीस ठाणे येथे स्वारगेट पोलीस ठाणे गु. र. नं. ७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये व स्वारगेट पोलीस ठाणे गु. र. नं. ७५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचां शोध घेत असताना दाखल गुन्हातील अज्ञात आरोपी हा गुन्हयातील चोरी केलेल्या लॉपटॉप सह सना पार्कीग लक्ष्मीनारायण चौक स्वारगेट येथुन ट्रॅव्हलसने पर राज्यात जाणे करीता येणार असुन त्यांने अंगामध्ये पांढ-या रंगाचा चौकडी शर्ट घातला आहे अशी बातमी पोउनि बाळु सिरसट यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत मिळाली होती. सदर बातमीच्या आशयानुसार सना पार्कीग व लक्ष्मीनारायण चौक येथे पोउनि बाळु सिरसट, पो. अं. नितीन क्षिरसागर, पो.अं. सुजय पवार हे सापळा रचुन थांबलेले असताना सदर वर्णनाचा संशयीत इसम हातात दोन बॅग घेऊन सना पार्कीगच्या पाठीमागील बाजुस थांबलेला दिसला त्यावेळी आमची बातमीप्रमाणे खात्री झाल्याने पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांस पकडुन त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) लियाकत गुडुसाब शेख वय ५६ वर्ष रा. एम एस मील मदीना कॉलनी गुलबर्गा पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याजवळ असेलेल्या बागमधील साहित्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे साहित्य स्वारगेट एस. टी स्टॅन्ड येथे बसमधुन लॅपटॉप चोरले असल्याचे सांगितल्याने, सदर साहित्य दाखल गुन्हातील चोरी गेलेली असल्याचे निष्पन्न झालेने ९३,०००/- एकुण रुपये किमतीचे एकुण दोन एच. पी. कंपणीचे दोन लॉपटॉप व ३,०००/- रुपये रोख रक्कम पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन जागीच जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार सोो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा सोो, पोलीस सह-आयुक्त पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मर्थना पाटील सो, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर, मा. श्री. राहुल आवारे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. युवराज नांद्रे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. रविद्र कस्पटे, पोलीस उप-निरीक्षक, श्री. बाळु सिरसट, पोलीस उप-निरीक्षक, पो. हवा. हर्षल शिंदे, पो. हवा. ठाकरे, पो. अं. नितीन क्षिरसागर, पो.अं. सुजय पवार पो. अं. संदिप घुले, पो. अं. दिपक खेदाड, पो. अं, नितीन दुधे, यांचे पथकाने केलेली आहे.