स्टील चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यानी केली गजाआड..

सह संपादक- रणजित मस्के
कोल्हापूर:११,६०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.मा. वरिष्ठाकडून प्राप्त झाले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना पोलीस अमंलदार वैभव पाटील यांना, आर्या स्टील कागल एमआयडीसी येथुन ट्रक चालक विश्वास पाटील व त्याचा मालक आकाश कापसे यांनी बांधकामाकरिता लागणारी लोखंडी सळी चोरी केली असून चोरलेली सळी ट्रकमध्ये सम्राट नगर येथे ठेवली असलेची गोपनीय बातमी मिळाली असता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सम्राट नगर येथे जावून आरोपी नामे १] आकाश संजय कापसे वय ३५ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर २] विश्वास विलास पाटील, वय ४३ वर्षे, रा.सम्राट नगर, नलवडे कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर यांना सळीने भरलेल्या ट्रकसह ताब्यात घेतले. त्यांचे कब्जात मिळाले बांधकामाचे लोखंडी सळीबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची सळी तीन दिवसापुर्वी फाईव स्टार एमआयडीसी कागल येथील आर्या स्टिल कंपनीतून चोरली असल्याची माहिती दिली. सदरबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ७३/२०२५ भा.न्या.सं. ३०३ (२), ३ [५] प्रमाणे गुन्हा दाखल असलेची खात्री झाली. सदर इसमांकडे बांधकामाची सळी व सळी चोरन्याकरिता वापरण्यात आलेला ट्रक असा एकुण ११,६०,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल कायदेशिर प्रक्रीया करून जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, गजानन गुरव, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संजय हुंबे, प्रविण पाटील, कृष्णात पिंगळे यांनी केली आहे.