राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या १ आरोपीस केली अटक

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

कोल्हापूर ;

त्याचे ताब्यातुन ८५,०००/- रुपये किंमतीचे ०४ गुन्हयातील ०४ मो.सा. चे सुटे पार्ट जप्त

राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई

पोलीस ठाणे

राजारामपुरी

गु.र.नं. व कलम

१) राजारामपुरी पो. ठाणे गु.र.नं. १३७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

उघडकीस आणलेले इतर गुन्हे

२) सदलगा पोलीस ठाणे, कर्नाटक गु.र.नं. १९/२०२५

३) सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. १३१/२०२५

४) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ४१८/२०२४

गुन्हा घडला तारीख, वेळ व ठिकाण

दि.०३.०३.२०२५ रोजी सकाळी ०८.३० वा. ते सांयकाळी ०७.३० वा. चे दरम्यान मुदतीत व्ही.टी. पाटील भवनच्या समोर असले पार्किंग मधुन

जप्त मुद्देमाल

१) ८५,०००/- रुपये किंमतीचे एकुण ०४ गुन्हयातील ०४ मो.सा. चे सुटे पार्ट

फिर्यादी

सुशिल शशिकांत जवळगेकर, व.व.६२, धंदा नोकरी, रा. वरुण फ्लोरा अपार्टमेट, उजळाईवाडी, कोल्हापूर

माहिती कशी प्राप्त झाली

गोपनिय बातमीदार यांचेकडुन

थोडक्यात हकीगत –

यातील फिर्यादी हे व्ही टी पाटील भवन, राजारामपुरी येथे नोकरीस आहे. वरील तारखेस, वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी त्यांचे मालकीचे मो.सा. MH-09-ED-0340 ही अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय डुप्लीकेट चावी चा वापर करुन चोरुन नेले बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक यांनी दिले तपास सुचाना प्रमाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख श्री दत्तात्रय भोजणे, पोलीस उपनिरीक्षक व समिर शेख, सहा. फौजदार तसेच अंमलदार यांनी गुन्हा घडले ठिकाणापासुनचे कर्नाटक राज्यातील मानकापुर, ता. चिकोडी, जि. बेळगांव या गावा दरम्यान असलेले अंदाजे १३५ सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासुन एका अज्ञात चोरट्याचा मागोवा घेवुन पोलीस अंमलदार संदिप सावंत यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत सदरची मो.सा. चोरी ही रेकॉर्डवरील आरोपीत नामे राहुल बंडोपंत मोरे, व.व. ३४, रा. माळवाडी, रांगोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याने केलेचे माहिती मिळालेने त्यास त्याचे रांगोळी येथील गावातुन ताब्यात घेवुन त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने सदर ची चोरी मीच केलेची समक्ष कबुली देवुन मो.सा. चोरुन त्याचे सुटे पार्ट करुन ते महादेव देवणे, रा. देवणे मळा, रांगोळी याचे ऊसाचे शेतात व त्याची चेस जवळच असले विहीरीमध्ये लपवुन ठेवलेचे सांगितले. त्यामुळे सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता ऊसाचे शेतामध्ये एकुण ०४ मो. सा. चे सुटे भाग मिळुन आले व जवळच असलेल्या विहीरीतुन ०४ मो.सा. च्या चेसीस मिळुन आल्याने आरोपीत याचेकडे सदर बाबत चौकशी करता आपणच सर्व मो.सा. चोरी केल्याची कबुली दिली. यातील इतर ०३ मिळुन आलेल्या सुट्या पार्ट बाबत माहिती घेतली असता अनुक्रमे ०१) सदलगा पोलीस ठाणे, कर्नाटक गु.र.नं. १९/२०२५, ०२) सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. १३१/२०२५, ०३) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ४१८/२०२४ प्रमाणे मो.सा. चोरीचे गुन्हे दाखल असले बाबत माहिती मिळाल्याने सदरचा एकुण ८५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष पंचमाना करुन ताब्यात घेणेत आला असुन इसम नामे राहुल बंडोपंत मोरे यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा अधिक तपास पो. हे. कॉ. ९१३ संदिप निळपणकर हे करीत आहेत.आरोपीचे नांव व पत्ता

१) राहुल बंडोपंत मोरे, व.व. ३४, रा. माळवाडी, रांगोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

आरोपी यास दि. ०६.०३.२०२५ रोजी २२.५८ वाजता अटक करण्यात आलेली आहे.

मा. पोलीस अधीक्षक सोो, कोल्हापूर श्री महेंद्र पंडीत
मा. अपर पोलीस अधीक्षक सोो, श्रीमती जयश्री देसाई
मा. उविभागीय पोलीस अधिकारी सोो, श्री अजित टिक्के

यांचे मार्गदर्शनाखाली

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
मा. पोलीस निरीक्षक, राजारामपुरी पोलीस ठाणे, श्री सुशांत चव्हाण
पोलीस उपनिरीक्षक, श्री दत्तात्रय भोजणे (गुन्हे शोध पथक प्रमुख)
सहा. फौजदार समिर शेख
पो.कॉ. संदिप सावंत, विशाल शिरगांवकर, सुशांत तळप, नितीश बागडी, अमोल पाटील, पो. हवालदार संदिप निळपणकर, गंगाराम पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट