मेसळयुक्त पनीर बनवनाऱ्या फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
दि.०७/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून अन्न व औषध प्रशासन पुणे यांना पत्रव्यवहार करून माणीकनगर, मांजरीखुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडावुन मध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालु असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी युनिट ६ कडील पथक व अन्न व औषध प्रशासना मार्फत धाड टाकली असता सदर ठिकाणी एकुण १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकुण ११,५६,६९०/- रू.चा मुद्देमाल मिळुन आला आहे. पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुणे तपासणीसाठी घेवुन उर्वरीत भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांचेकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी वसेच असा प्रकार आढळुन आल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेकडे तक्रार करावी.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालया कडील सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहूल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त (अन्न) पुणे श्री. बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), पुणे श्रीमती अस्मिता गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे, श्रीमती सुप्रिया जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे श्री एल डब्ल्यु साळवे, नमुना सहायक, पुणे यांनी केली आहे.