परिमंडळ- १ कार्यक्षेत्रात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच जागतिक महिला दिनाचे अनुषंगाने बाईक रॅलीचे आयोजन

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
बेटी पढ़ाओ, बेटी बचाओचे अनुषंगाने तसेच ८ मार्च जागतिक महिला दिनाचे अनुषंगाने परिमंडळ-१ कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे दि.०७.०३.२०२५ ते दि. १०.०३.२०२५ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून त्यामध्ये दि.०७/०३/२०२५ रोजी पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदार यांची बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरबाईक रॅलीची शनिवारवाडा येथून सुरूवात करण्यात आली होती. त्याकरीता श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे यांनी फ्लॅग दाखवून सुरुवात केलेली असून रॅलीचा मार्ग हा शिवाजी रोडने बुधवार चौक बेलबाग चौक उजवीकडे वळून सरळ पुढे लक्ष्मी रोडने सेवासदन अलका टॉकीज चौक डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खंडोजी बाबा चौक गुडलक चौक फर्ग्युसन कॉलेज रोडने मॉर्डन कॉलेज रोडने बालगंधर्व चौक येथे समारोप करण्यात आला.
बाईक रॅली समारोप कार्यक्रमा करीता मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, हे उपस्थितीत होते. बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले महिला अधिकारी व अंमलदार यांचा मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बाईक रॅलीमध्ये महिला अधिकारी सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने, श्रीमती विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन, श्रीमती गिरीषा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन, श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक, गुन्हे, खडक पोलीस ठाणे पुणे शहर व परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन कडील ०१ सीआर मोबाईल, पीटर मोबाईल, तसेच ३० ते ४० दधाकी मोटार सायकलवर ४ पोलीस निरीक्षक, ६ महिला सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक व ६० महिला अंमलदार सहभागी झाल्या होत्या. बाईक रॅलीमध्ये महिला अधिकारी व अंमलदार यांचेकडुन बेटी बचाओ व बेटी पढाओ यांचे नागरिकांना पोस्टर दाखवुन त्यांचेमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे.
सदर बाईक रॅलीचे आयोजन मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे शहर श्री. संदीप सिंह गिल्ल, यांनी तसेच सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पो. ठाणे श्रीमती विजयामाला पवार, व श्रीमती गिरीषा निंबाळकर व श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक, गुन्हे, खडक पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केलेले आहे.