शेअर मार्केट गुंतवणूकीखाली वेगवेगळे टास्क देवून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामध्ये कोंढवा पोलीसानी ४३ लाख रूपये फिर्यादीस केले परत..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
सध्या तंत्रज्ञानाचे युग असून इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सर्व वयोगटातील व्यक्ती सोशल मिडीया (व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्टिटर इ.) अनेक मोबाईल अॅप व ऑनलाईन गेम यावर त्यांचा बहुमुल्य वेळ घालवत आहेत. त्यावरुन नागरिकांची मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक होत आहे.
तक्रारदार, वय-६३ वर्षे, रा. कोंढवा, पुणे यांनी नॅशनल सायबर ऑनलाईन पोर्टलवर दिलेली तक्रार कार्यवाही करिता कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे येथील सायबर विभागास प्राप्त झाली होती. त्यामध्ये तक्रारदार यांनी त्यांची शेअर ट्रेडींग करण्याच्या नावाखाली वेगवेगळे टास्क करण्यास सांगून, त्यांना चांगला लाभ मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांची एकूण रु. ४६,७५,०००/-रक्कम रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार दिली होती. त्यावरून कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.११७४/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ थे कतम ३१८(४), ३१९ (२), ३ (५), सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचे तपासामध्ये तक्रारदार यांची फसवणूक झालेली एकूण रु.४६,७५,०००/-रक्कम वेगवेगळ्या खात्यावर पाठविल्याचे दिसून आले. सायबर विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, पो. अमंलदार राहूल शितोळे व म.पो. अमंलदार अश्विनी सावंत यांनी तक्रारदार यांचेशी समन्वय ठेवून गुन्हयाचे तपासामध्ये तक्रारदार यांचे खात्यावरून झालेल्या ट्रान्झेक्शन बाबत माहिती घेवून संबंधित बँक/मर्चट यांना संपर्क केला व फसवणूक झालेल्या रक्कमेतील ४३,०४,०६०/-रूपये रक्कम गोठवून मा. न्यायालयाचे आदेशानुसार तक्रारदार यांचे खात्यावर परत मिळवून देण्यात कोंढवा पोलीस स्टेशनचे सायबर विभागास यश मिळाले आहे. तक्रारदार यांनी गुन्हयाचे तपासाबाबत समाधान व्यक्त करून कोंढवा पोलीस स्टेशनचे आभार मानले आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, डॉ, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री. धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अब्दुल रऊफ शेख यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, मयुर वैरागकर, पोलीस अमंलदार राहूल शितोळे, अरुण किटे, लवेश शिंदे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावंत यांनी केली आहे.