गोंदी पोलीसांनी नालेवाडी शिवारात ३ वाळुने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करुन २२ लाखाचा मुद्देमाल केला जप्त

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

जालना

गोंदी पोलीस ठाणे येथे सपोनि खांडेकर साहेब यांना माहिती मिळाली कि, नालेवाडी शिवारात भांबेरी नालेवाडी रोडने ट्रॅक्टरने वाळुची चोरटी वाहतुक चालु आहे. त्यावरुन सपोनि खांडेकर साहेब यांनी सदर ठिकाणी फौजदार बलभिम राऊत, पोहेकाँ/रामदास केंद्रे, पोहेकाँ/ गणेश मुंढे, पोकाँ/ शाकेर सिद्धिकी, पोकाँ/दिपक भोजणे, पोकाँ/विजय काळे यांना पाठवले. सदर ठिकाणी फौजदार बलभिम राऊत वरील स्टाफसह पोहोचले असता त्यांना नालेवाडी शिवारात सौरउर्जा प्लांटजवळ तीन ट्रॅक्टर वाळुने भरलेले वाहतुक करताना दिसुन आले. फौजदार बलभिम राऊत यांनी स्टाफच्या मदतीने सदर ट्रॅक्टर थांबविले. त्यामधिल एक ट्रॅक्टर पळुन गेला. त्यानंतर स्टाफने पळुन गेलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करुन पकडला. सदर ट्रॅक्टर चालकास त्यांचे नाव विचारले असता त्यांनी 1) एजाज हारुन बेग 2) ऋषीकेश दिलीप ससाणे 3) नितीन चंद्रकांत नरवडे सर्व रा. साष्टपिंपळगाव ता. अंबड जि. जालना असे सांगीतले सदर वाळुने भरलेले तीन्ही ट्रॅक्टर जप्त करुन पोलीस ठाणे गोंदी येथे आणुन जप्त करण्यात आले असुन असा एकुण 22,60,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. अजकुमार बंसल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री. विशाल खांबे साहेब, मा. सहा. पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, फौजदार बलभिम राऊत, पोहेकाँ/रामदास केंद्रे, पोहेकाँ/गणेश मुंढे, पोकाँ/ शाकेर सिद्धिकी, पोकाँ/दिपक भोजणे, पोकाँ/विजय काळे, होमगार्ड तुकाराम कणके, अर्जुन माने, लहु राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट