वाघोली व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई…

0
WhatsApp Image 2025-03-07 at 9.44.16 PM (1)
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

दि.०६/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण व पथक असे यूनिट हद्दीत अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत रामदरा डोगराचे पायथ्याशी मुकेश करमावत, वय ५० वर्षे, रा. गणेशनगर, नवरत्न गोडवून जवळ, मंतरवाडी, फुरसुंगी, पुणे हा हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने छापा कारवाई केली असता एकुण रु. ८,३५,०००/- रू कि.चा मुद्देमाल मिळुन आला त्यामध्ये गावठी हातभट्टीची सुमारे ७५० लिटर तयार दारु १५,००० लीटर कच्चे रसायण व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळुन आल्याने मुकेश करमावत याचे विरुद्ध लोणी काळभोर पो.स्टे येथे गु.र.नं.१२०/२०२५ महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास लोणी काळभोर पो.स्टे. यांचे कडुन करण्यात येत आहे.

तसेच दि.०५/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील पथक युनिट हद्दीत अवैध धंद्यांच्या अनुषंगाणे पेट्रोलिंग करत असताना बोरकर वस्ती भावडी, वाघोली पुणे येथील मोकळ्या जागेत महिला नामे रीना पवन राजपूत ही हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने छापा कारवाई केली असता एकूण १,५७,०००/- रू कि.चा मुद्देमाल त्यामध्ये ७० लिटर गावठी हातमदीची तयार दारू, ४००० लिटर कच्चे रसायण व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळुन आल्याने महिला नामे रीना पवन राजपूत हिचे विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास वाघोली पो.स्टे. यांचे कडुन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट