गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाची धोकादायक गुंडाविरुद्ध “MPDA” कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई..

0
WhatsApp Image 2025-03-05 at 7.10.14 PM (1)
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

गोंदिया

जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी, मा. श्री. प्रजित नायर, यांचे दिनांक-28 फेब्रुवारी 2025 रोजीचे एम.पी. डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाईचे स्थानबध्दतेचे आदेश..

🔴 पोलीस ठाणे- गोरेगाव हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे- शाहरुख हमीद शेख वय 26 वर्षे राहणार वार्ड नंबर 2 कुऱ्हाडी, तालुका- गोरेगाव जिल्हा- गोंदिया यास एका वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह- अमरावती, जिल्हा – अमरावती येथे केले स्थानबद्ध-

⏩ गोंदिया जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर MPDA  (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत..

          त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक, गोरेगाव श्री अजय भुसारी यांनी पो.ठाणे- गोरेगाव हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे- शाहरुख हमीद शेख रा. कुऱ्हाडी याचेविरुद्ध  *एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी)  कायद्यानुसार  उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. प्रमोद मडामे, उपविभाग तिरोडा श्री. साहिल झरकर, यांचे मार्फतीने मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांना प्रस्ताव पाठविण्यात आले होते.... सदरचा MPDA प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील प्रतिबंधक सेल द्वारे तयार करून मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांचे मार्फतीने  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया मा. श्री. प्रजित नायर यांचेकडे मंजुरी करीता सादर करण्यात आले होते..

❇️ जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, यांनी प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंडा इसमाविरूद्ध एम.पी.डी. ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्याचे कलम 3(1) अन्वये दिनांक- 28/03/2025 रोजीचे आदेश्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे…

🔴 एम.पी.डी.ए.(MPDA) कायद्या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन- रामनगर हद्दीतील अट्टल सराईत धोकादायक गुंड ईसंम नामे – शाहरुख हमीद शेख वय 26 वर्षे राहणार वार्ड नंबर 2 कुऱ्हाडी, तालुका- गोरेगाव जिल्हा- गोंदिया याच्याविरुद्ध MPDA कायादयाअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे… दिनांक- 04/03/2025 रोजी नमूद गुन्हेगारास मध्यवर्ती कारागृह अमरावती , जिल्हा – अमरावती येथे एका वर्षाकरीता दाखल करण्यात आले असून……. स्थानबद्ध करण्यात आले आहे..

🔴 शाहरुख हमीद शेख रा. कुऱ्हाडी, या गुंडाविरूध्द विविध 5 गंभीर गुन्ह्याची नोंद असुन त्यामध्ये प्रामुख्याने -अपघात घडवून खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अनुसूचित जाती जमाती च्या व्यक्तींना शिवीगाळ, विनयभंग करणे, बाल लैंगिक अत्याचार करणे, मारहाण करणे, ईत्यादी प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.. तसेच पोलिसांनी याच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक उपाययोजना कारवाई करून सुद्धा याचे चरित्रात सुधारणा झाली नाही..

⏩ पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे  निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. प्रमोद मडामे, उपविपोअ तिरोडा श्री. साहिल झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, प्रतिबंधक सेल चे म.पो.उप.नि. वनिता सायकर, पोलीस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी पोलीस ठाणे गोरेगाव येथील पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी, मसपोनि. त्र्यंबके, पोउपनि सुजित घोलप, अंमलदार विजेंद्र बिसेन, महेंद्र भोयर, जयेश रहांगडाले यांनी कार्यवाही पार पाडली...

🔴 काय आहे एम. पी. डी. ए कायदा ?👇
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबत अधिनियम 1981 म्हणजेच एम पी. डी. ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी) होय…. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट