भारताची परंपरा मोडायला निघालेल्यांची संख्या जास्त डॉ. नितीश भारद्वाज यांचे परखड मतः ज्योतिष सोहळ्याचा समारोप

सह संपादक-रणजित मस्के
पुणे ;
“भारताची ज्ञान आणि ध्यान परंपरा
मोठी आहे, पण ते मोडायला निघालेल्या लोकांची संख्या जास्त दिसते आहे. त्यांना आपण सावरून घेण्याची आवश्यकता आहे,” असे परखड मत अभिनेते व दिग्दर्शक डॉ. नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केले.



आदिनाथ साळवी आणि वैशाली साळवी यांच्यातर्फे आयोजित ‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा २०२५’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भारद्वाज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. सुभाष महाजन, डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, विधिलिखित संस्थेचे संस्थापक आदिनाथ साळवी, अॅड. वैशाली साळवी आदी उपस्थित होते.यावेळी य. न. मग्गीरवार, सिद्धेश्वर मारटकर, सुरेंद्र पटवर्धन आणि गोविंद हेंद्रे यांचा ‘विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. ‘मच्छिंद्र नामदेव साळवी स्मृती निबंध स्पर्धे’त अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार पटकावणाऱ्या डॉ. उमेश सांगवीकर, श्रद्धा बेळगी व समीर खोत यांना देखील पारितोषिके देण्यात आली.
श्रोत्यांच्या मतदानाने मिळालेला ‘विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार’ हा डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, जितेंद्र वझे, डॉ. विजय महाजन, मुग्धा पत्की, प्राची मलमकर, शुभांगिनी पांगारकर आणि अपर्णा गोरेगावकर यांना प्रदान करण्यात आला.