चंदननगर तपास पथकाने घरकाम करणारे महिलेने केलेल्या चोरीचा केला पर्दाफाश..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

दिनांक २६/०२/२०२५ रोजी फिर्यादी महिला वय ५२ वर्षे रा. वडगावशेरी, पुणे यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन कळविले की, त्या दि.१७/०२/२०२५ ते दिनांक २५/०२/२०२५ या दरम्यान कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेले असताना, त्या दरम्यान त्यांचे घरात घरकाम करणारी (मेड) महिला नामे ऋतुजा सुरुशे हिने त्यांचे बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली असलेबाबत सांगितल्याने, त्यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि. नं.१०६/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०६ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.

दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने म. पोलीस उप निरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील व सपोनिरी श्री. प्रशांत माने व तपास पथकातील अंमलदार यांनी सखोल तपास करुन गुन्ह्यातील आरोपी महिला नामे ऋतुजा राजेश सुरुशे रा.सं.नं.५६/१३, अॅसम्बली चर्च मागे, वडगावशेरी, पुणे हिला ताब्यात घेतले असता तीने फिर्यादी यांचे घरातील एकूण २७.५ ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिणे चोरी केलेबाबत कबूल केले. त्यावेळेस तीची अंगझडती घेता तीचे जवळ एकूण ७७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ५५००/-रुपये मिळून आले. त्यामुळे तीचेकडे अधिक तपास करता तीने चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.१०७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) मधील फिर्यादी वय ३५ वर्षे रा.जुना मुंढवा रोड, खराडी यांचेही राहते घरातील दि.१५/०१/२०२५ रोजी ते दि.२५/०२/२०२५ रोजीचे दरम्यान एकुण ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५,५००/- असा एकुण ३,१५,५००/-रुपये किमतीचा माल चोरल्याचे कबुल केले आहे.

दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी ऋतुजा राजेश सुरुशे हिचा शोध घेऊन तीचेकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि. नं.१०६/२०२५ व १०७/२०२५ हे दोन गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील चोरीस गेलेले दागिन्यापैकी एकुण ७७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोपेड गाडी व रोख रक्कम ५,५००/- असा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्रीमती सीमा ढाकणे, सहा पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत माने, म. पोलीस उप निरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील, श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री. लक्ष्मण नवघणे, पोलीस अमंलदार कळसाईत, गिरमे व महिला पोलीस अमंलदार काकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट