दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यानी विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन वाहनचोरीचे एकुण ८ गुन्हे केले उघडकीस

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरीचे गुन्हें उघडकीस आणणेबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले आहे. दिनांक ०३/०३/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हडीत गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे एका विधीसंघर्षग्रस्त बालक याचे कब्ज़ात मिळुन आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे संशय आल्याने त्याला विश्वासात घेवून, त्याचेकडे अधिक तपास केला असता, त्याने पुणे शहर कार्यक्षेत्रातुन दुचाकी वाहने चोरी केलेली होती, नमुद विधीसंघर्षग्रस्त बालक याचेकडुन किंमत १,९०,०००/- रुपयांच्या एकुण ०८ दुचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करुन, खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
१) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७९/२०२५ बी, एन. एस. सन २०२३ चे कलम ३०३ (२)
२) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुम्हा रजि. नं. १२९/२०२५ बी. एन. एस. सन २०२३ चे कलम ३०३ (२)
३) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १२६/२०२५ बी, एन. एस, सन २०२३ चे कलम ३०३ (२)
४) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ८७/२०२५ बी. एन. एस. सन २०२३ चे कलम ३०३(२)
५) पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६६/२०२५ बी. एन. एस, सन २०२३ चे कलम ३०३ (२)
६) फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४६/२०२४ थी. एन. एस, सन २०२३ चे कलम ३०३(२)
७) फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४७/२०२५ बी. एन. एस. सन २०२३ चे कलम ३०३ (२)
८) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ११९/२०२५ बी. एन. एस, सन २०२३ चे कलम ३०३ (२)
वरीलप्रमाणे वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एकुण ०८ दुचाकी वाहने असा एकुण १,९०,०००/- रुपयांचा मुद्देमाल विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून जप्त करुन, ०८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई दरोख व वाहनचोरी विरोधी पथक १, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रविण काळुखे व पोलीस अंमलदार, अमित गद्रे, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, महेश पाटील, साईकुमार कारके, नारायण बनकर यांनी केली आहे.