दुचाकी वाहन चोरी व सायकल चोरी करणा-या गुन्हेगारास अटक करुन त्याचेकडुन ४ मोटर सायकल व १ सायकल जप्त

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
एकुण ४ गुन्हे उघडकीस…!
दि.२५/०२/२०२५ रोजी पोलीस उप निरिक्षक अरविंद शिंदे व सपोफी मोकाशी, व स्टाफ असे पोलीस स्टेशन हद्दीत पायी पेट्रोलीग करीत असता, पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर व महेश राठोड यांना त्याचे बातमीदारमार्फतीने बातमी मिळाली की एक इसम ढमढेरे गल्ली बुधवार पेठ पुणे येथे एक पांढ-या रंगाची मोटर सायकल घेवुन संशयीत रित्या थांबल्याबाबत माहिती मिळाल्याने त्याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविली असता त्यांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे पोलीस उप निरिक्षक अरविंद शिंदे व स्टाफ ढमढेरे गल्ली बुधवार पेठ पुणे येथे जाताच त्याठिकाणी बातमी प्रमाणे एक इसम पांढ-या रंगाची मोचार सायकल घेवुन थांबलेला दिसल्याने लागलीच पोलीस स्टाफ त्याची नजर चुकवुन त्याचे जवळ जाऊ लागले असता, त्यास संशय असल्याने तो दुचाकी वाहन चालु करीत असताना, त्यास स्टाफने जागीच पकडुन त्याचेकडे चौकशी करता त्याने त्याचे नाव पत्ता आकाश हेरु कुंचन, २६ वर्षे, रा. वाटा गल्ली, तितली संस्था जवळ, बुधवार पेठ पुणे असे असल्याचे सांगितले.
त्यास त्याचे कडील मोटर सायकल बाक्त चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास व त्याचेकडे मिळुन आलेली मोटार सायकल ही पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता आरोपी याचेकडे मिळुन आलेली मोटार सायकल ही फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर त्याचेकडे अधिक तपास करता त्याने आणखी ३ नोटार सायकल व १ सायकल फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतुन तसेच पुणे स्टेशन परिसरातुन १ दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्हयामध्ये अटक करुन त्याचेकडुन एकुण १,१५,०००/- रु. च्या ४ दुचाकी व १ सायकल हस्तगत करुन ४ गुन्हे उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परी.१ श्री. संदिपसिंग गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्री. साईनाथ ठोंबरे (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप निरी अरविंद शिंदे, सपोफी मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, तानाजी नागरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, नितीन जाधव, गजानन सोनुने, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली.