प्रगती मूल्यमापना मध्ये सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय राज्यात द्वितीय क्रमांकाने सन्मानित…

0
WhatsApp Image 2025-02-28 at 9.21.38 PM (1)
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सातारा :

राज्यस्तरिय, विभागस्तरिय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक पध्दतीने चालावे याकरीता दि.०७ जानेवारी २०२५ ते दि.१६ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १०० दिवसांची “कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आज दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे मा. मुख्यमंत्री महोदय, श्री. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य, मा. उप मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री श्री. अजीतदादा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला.


महाराष्ट्र राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव आयुक्त/संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र व महानिरीक्षक / उप महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे – कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारसण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI), नाविन्यपूर्ण उपक्रम, इत्यादी निकषांच्या आधारे मुल्यमापन करण्यात आले.

या अंतिरिम प्रगतीच्या मुल्यमापनामध्ये राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयामधुन सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सदरच्या उल्लेखनिय कामगिरीकरीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांचे नेतृत्वाखाली व योग्य मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. मुख्यमंत्री, श्री. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांना अभिनंदन पत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.

सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे सातारा जिल्हा पोलीस दलास हे उत्तुंग यश मिळाले आहे व भविष्यात ही सातारा जिल्हा पोलीस दलाकडून उल्लेखनीय कामगिरीचा आलेख चढता राहील असे पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने केलेल्या गौरवपुर्ण कामगिरीबद्दल सातारा जिल्हा पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सातारा जिल्हा पोलीस दलातील अंमलदार यांनी श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट