मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचा दि.२४/०२/२०२५ चा दौरा कार्यक्रम…

0
WhatsApp Image 2025-02-25 at 2.58.09 PM
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

कोल्हापूर:

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी सर हे दि. २०/०२/२०२५ ते दि. २५/०२/२०२५ चे दरम्यान सांगली पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण/तपासणी अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.

दि.२४.०२.२०२५ रोजी सांगली जिल्हयातील उद्योजक, सराफ असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, बार असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक व इतर नागरीक यांची श्री. सुनिल फुलारी, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी बैठक घेतली. सदर बैठकीत मा. आय. जी. सरांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन तात्काळ त्यांच्या शंकेचे निरसन करून मार्गदर्शन केले. याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी उपस्थितांच्या सुचना समजून घेवून पोलीस त्यावर करत असलेले काम व पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर २०२४ सालामध्ये सांगली जिल्हयातील पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे १) सांगली कॉलेज कार्नर क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, सांगली २) श्री महात्मा गणेश उत्सव मंडळ, मिरज, ३) सिध्देश्वर गणेशोत्सव मंडळ, अंकलखोप, ता. पलूस यांचा श्री. सुनिल फुलारी, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी प्रशंसापत्र देवून गौरव केला.

विधानसभा / लोकसभा निवडणूक कालावधीत आपले भरीव योगदान देणाऱ्या सांगली जिल्हयातील शहर विभागातील सौ. श्रुती शरद गुरव (तुंग), सौ. शुंभागी शिवाजी पाटील (कर्नाळ), मिरत विभागातील सौ. मिलींद पाटील (सोनी), सौ. शारदा संभाजी हंगे (बेडग), विटा विभागातील सौ. अनिता अर्जुन पाटील (जांभूळणी), सौ. रेखाताई प्रदिप दुबिले (खंबाळे औंद), इस्लामपूर विभागातील रुपाली दिनेश तिके (सागाव), सौ. जयश्री सुभाष ताटे (नवे खेड), जत विभागातील कुमारी सविता सोपान कांबळे (गुड्डापूर), सौ. सिध्दाक्का राजू तेली (करजगी), तासगाव विभागातील सौ. स्वाती अविनाश पाटील (लोंढे), सौ. ज्योस्ना निलेश नलावडे (शेरे दुधोंडी) असे ६ पोलीस उपविभागातील एकूण १२ महिला पोलीस पाटील यांना प्रशंसापत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

सदर बैठकीकरीता पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, जिल्हा विशेष शाखा, तसेच सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी तसेच मोठ्या संख्येत उद्योजक व्यापारी, सराफ, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच यानंतर श्री. सुनिल फुलारी, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी वाहतुक शाखा, सांगली व वाहतुक शाखा, मिरज येथे वार्षिक निरीक्षणाचे अनुषंगाने भेटी देवून दप्तर तपासणी केली. यावेळी त्यांनी दोन्ही वाहतुक शाखेचे कामकाजाबाबत पाहणी करून सुचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट