मांडुल जातीचा वन्यजीव साप बाळगुन त्याची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

प्रतिनिधी- रेश्मा माने
महाड (बिरवाडी): रोहा वनविभाग परिमंडळ बिरवाडी रौ.गु.न वन्यजीव- 1/- 22 प्र.रि.क्र.1 /22 दि.16/11/2022 मौजे भिवघर – निगडे रस्ताला ता. महाड, जि. रायगड वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39,44 (अ) (4), 48 (अ),49,51,52 अन्वये

- सचिन सहदेव पवार, रा. मोहोत, ता. महाड, जि. रायगड,
- महेश रमेश मालूसरे, रा. काळीज – बिरवाडी, ता. महाड, जि. रायगड हे
दिनांक 16/11/2022 रोजी सिस्केप संस्था व आऊल्स संस्थेचे प्रतिनिधी यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन मा. उप.वनसंरक्षक रोहा व मा. सहा. वनसरंक्षक (जंकास व कॅम्पा) रोहा यांचे मार्गदर्शन घेवून वनक्षेत्रपाल महाड यांनी. सचिन सहदेव पवार, रा. मोहोत, ता. महाड, जि. रायगड यांचेकडे सात महिन्यापासुन मांडूळ जातीचा साप ठेवला होता त्यांची विक्रि करणार असल्याने सचिन महादेव पवार रा. मोहोत – बिरवाडी, ता. महाड, जि. रायगड व महेश रमेश मालुसरे, रा. काळीज, ता. महाड, जि. रायगड यांनी भिवघर – निगडे रस्तालगत सापळा लावून वनक्षेत्रपाल महाड, वनपाल बिरवाडी, वनपाल दापोली व स्टाफ यांनी पकडले. त्यांच्या कडुन 2 मोबाईल 1 मोटार सालकल व 1. जिवंत मांडूळ जातीचा साप ताब्यात घेवून आरोपी वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39,44 (अ) (4), 48 (अ), 49,51,52, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास वनक्षेत्रपाल महाड करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com