राजस्थान मध्ये खुन करुन पुणे येथे पळुन आलेल्या आरोपींच्या बंडगार्डन पोलीसांनी आवळल्या मुसक्या

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
यातील फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा कमलेश जेठाराम मेवाड वय ३२ वर्षे रा. सदर हा मिसिंग असलेबाबत सोजत सिटी पोलीस ठाणे ता. सोजत सिटी जि.पाली येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती. दि.२०/०२/२०२५ रोजी सदर मिसिंग मधिल कलमेश जेठाराम मेवाड याचा कोणीतरी अज्ञात इसमाने खुन करुन एका शेतामधील खड्डयामध्ये पुरुन ठेवलेला मिळुन आला होता. सदरची मयत बॉडी त्याचे वडील यांनी पाहुन ओळखुन त्याचाच मुलगा नामे कलमेश जेठाराम मेवाड याची असल्याचे सांगितल्याने सोजत सिटी पोलीस स्टेशन (राज्य राजस्थान) गु.र.नं.३९/२०२५ बी.एन.एस.१०३ (१), २३८ (अ) प्रमाणे अज्ञात इसमाचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हयाचा तपास सोजत सिटी पोलीस करीत असताना सदरचा खुन हा मयताची पत्नी व तिचा मित्र आशोक काळुराम राठोड वय २५ वर्षे रा. बघेला पाल, सिनेमा रोड, सोजत सिटी, ता. सोजत जि. पाली यांनी संगणमताने केल्याचे तपासमध्ये निष्पन्न झाले होते. सदर आरोपीत हे पुणे रेल्वे स्टेशन परीसरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीलांना ताब्यात घेणेबाबत मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार तपास पथक प्रभारी अधिकारी श्री. स्वप्नील लोहार व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड, हे दाखल गुन्हयातील प्राप्त वर्णनाच्या आरोपीचा शोध घेत असताना सदरचे दोन्ही आरोपी पुणे स्टेशन जवळील जयप्रकाश गार्डन, पुणे येथे एका रिक्षाच्या आडोशाला लपले असल्याचे दिसून आल्याने पोलीस स्टेशन कडील महिला अंमलदार यांना सदर ठिकाणी बोलावुन दोन्ही आरोपीना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता सुखीदेवी कमलेश मेवाड वय ३० वर्षे रा. पावटा का चौक सोजत सिटी ता. सोजत सिटी जि. पाली राज्य राजस्थान आशोक काळुराम राठोड वय २५ वर्षे रा. बघेला पाल, सिनेमा रोड, सोजत सिटी, ता. सोजत जि. पाली असे असल्याचे सांगितल्याने त्यांना अधिक चौकशी कामी बंडगार्डन पोलीस ठाणे येथे घेवुन येवून सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्यांनी केल्याची कबुली दिल्याने पुढील कारवाई करणे बाबत सोजत सिटी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, श्री. दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
उप-निरीक्षक स्वप्निल लोहार, प्रदिप शितोळे, सारस साळवी, ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड, यांचे पथकाने केली आहे.