पुणे शहर यांचे कल्पनेतुन पुणे वाहतूक पोलीस अॅकेडमी ही संकल्पनेचे आयोजन..

सह संपादक-रणजित मस्के
पुणे ;
सह. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे वाहतूक पोलीस अॅकेडमीचे प्रशिक्षण सत्र क्र. १ चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २३.०२.२०२५ ते २५.०२.२०२५ या कालावधीत प्रथम रात्र संपन्न झाले. या प्रशिक्षण सत्रामध्ये मानांकीत व आंतरराष्ट्रीय पातीळीचे तज्ञ यांचेकडुन वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले.





सदर प्रशिक्षणमध्ये साफ्ट सिक्ल, मानसोपचार, मोटार वाहन कायाद्याचे प्रशिक्षण व त्यांचे नियमन, ग्रीन कॅरीडार व व्हिव्हिआयपी कॅन्व्हाय दरम्यान करायची कार्यवाही वाहतूक पोलीसांचे जनतेशी वागणे व पीसीआर (फेस्ट अॅन्ड ट्रीट्रमेंट) ट्राफीक ई-चलान प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेब वाहतूक शाखेस नेमणूकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा मानास होता.
पुणे बाहतूक पोलीस अॅकेडमी प्रशिक्षण सत्रामध्ये वाहतूक शाखेस कार्यरत १००% पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात सदर अॅकडमी मध्ये तांत्रिक व इतर प्रशिक्षणाचा अंर्तभाव करून याची व्याप्ती वाढवली जाणार आहे.
दिनांक २३/०२/२०२५ ते दिनांक २५/०२/२०२५ या कालावधीत तीन दिवसाच्या प्रथम सत्रात सकाळी १०:०० ते साय. १७:०० वाजेपर्यंत वाहतूक शाखेतील एकुण ५ पोलीस अधिकारी व ६० पोलीस अंमलदार यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
पुढील १०० दिवसात वाहतूक शाखेस कार्यरत १००% पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे
समन्वय अधिकारी म्हणुन म.पो. निरीक्षक / रूनाल मुल्ला, पो.निरीक्षक / बाळकोटगी, ग्रे. पोउपनि /रघतवान, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खालील ख्यातनाम प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले.
श्री अजय अगरवाल, डायरेक्टर, Top Management Consortium Foundation, यांच मोलाचे सहकार्य या प्रशिक्षणास मिळाले आहे.
नमुद सत्रात खालील नमुदे व्याख्याते यांनी संबंधीत विषयाचे मार्गदर्शन केले.
१. श्रीमती मंजिरी गोखले सॉफ्ट स्किल
२. श्री सुरेश गोखले सॉफ्ट स्किल
३. श्रीमती उर्मिला दिक्षीतः सॉफ्ट स्किल (मानसोपचार तज्ञ)
४. श्री अनिल पंतोजी (RTO) Rules of the road regulation
५. श्री प्रकाश जाधव (RTO) मोटार वाहन कायदा प्रकरण ८ वाहतूक नियंत्रण
६. सहा.पो.आ. श्री विजय पळसुले व्हि. व्हि. आय. पी कॅनव्हॉय, फायर ब्रिगेड
७. सहा. पो.आ. श्री सुरेंद्र देशमुख ग्रीन कॉरीडोर
८. श्रे. पोउपनि श्री रघतवान वाहतूक नियमन व पोलीसांचे जनतेशी कर्तव्य, मॅन्युअल
सिग्नल
९. वैद्यकीय अधिकारी, जहांगीर हॉस्पीटल PCR First Aid Treatment
१०. श्री अमित गोंजारी ट्राफिक ई-चलान प्रॅक्टीकल
या प्रशिक्षण सत्रात भाग घेतलेल्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी यांची परिक्षा घेण्यात आली व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी अंमलदार यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामुळे वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी / अंमलदार यांना वाहन कायदे, तंत्रज्ञान, ई-चलान मशीनचा योग्य वापर, जनतेशी सौहार्थाने वागणूक, अचानक येणाऱ्या अडचणी किंवा अपघात प्रसंगी घ्यावयाची काळजी व निर्णय याबाबत ज्ञान प्राप्त होण्यास मदत होणार आहे.