गोवा बनावटीची दारू इनोव्हा कारसहीत ताब्यात..

सह संपादक- रणजित मस्के
कोल्हापूर :- कानुर खुर्द ते विंझणे रोडवर महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीचे दारुची वाहतुक करणारे इनोव्हा कार नंबर एमएच 04 डी वाय 0654 चा चंदगड पोलीसांनी पाठलाग केला असता अज्ञात आरोपीने वाहन विंझणे गावी रोडकडेला सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला आहे.
सदर वाहनातून 5,12,400 /-रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु व इनोव्हा कार असा एकुण 14,12,400 /- रुपयेचा माल जप्त केलेबाबत अज्ञात आरोपीविरुध्द चंदगड पोलीस ठाणेत गुन्हा दाखल.

महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याचे उद्देशाने गोवा राज्यातुन गोवा बनावटीची दारु अवैधरित्या महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुक करणारे दारु विक्रत्याचा शोध घेवुन त्याचेवर कायदेशिर कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत साो यांनी आदेश दिले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत साो यांनी दिले आदेशाप्रमाणे मा. अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे-पाटील व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. रामदास इंगवले साो यांचे मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक यांनी गोवा बनावटीच्या दारुची विक्री व वाहतुक करणारे दारु विक्रेत्यावर कारवाई करणेकरीता चंदगड पोलीस ठाणेकडील पोलीस पथक तयार केले आहे. आज दि. 20/02/2025 रोजी चंदगड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. विश्वास पाटील, पोलीस
निरीक्षक, पोहवा/782 सुनिल माळी, पोहवा /970 तुकाराम राजीगरे, पोशि/1829 नितीन पाटील, पोशि/513 आशितोष शिऊडकर, पोशि/391 ईश्वर नावलगी असे अवैध धंद्यावर कारवाई करणेकरीता सरकारी वाहनाने पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाले, पेट्रोलिंग दरम्यान मा. श्री. विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बेळगांव वेगुर्ला रोडवरुन एक इसम सिल्व्हर रंगाची इनोव्हा कारमधुन गोवा बनावटीचे दारुची वाहतुक करणार आहे अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे वरील पोलीस स्टाफ बेळगांव वेगुर्ला जाणारे रोडवरील जाणारे वाहनावर वॉच करीत असताना मिळाले बातमीप्रमाणे वेगुर्ला गावाकडुन बेळगांव गावाकडे एक संशयित सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार नंबर एमएच 04 डी वाय 0654 ही भरधाव येत असलेली दिसली, सदर वाहनास पोलीसांनी 00.30 वाजता हाताने थांबण्याबाबत इशारा केला असता इनोव्हा कार चालकांने वाहन न थांबविता तसेच पुढे भरधाव वेगात निघुन गेला त्याचा पोलीसांनी कानुद खुर्द, नागनवाडी फाटा, अडकुर ते विंझणे असा सरकारी वाहनाने पाठलाग केला असता अज्ञात आरोपी चालकांने त्यांचे ताब्यातील इनोव्हा कार विंझणे गावचे हद्दीत रोडकडेला सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आहे. पोलीसांनी इनोव्हा कारची तपासणी केली असता कारचे मागील बाजुस वेगवेगळ्या कंपनीच्या गोवा बनावटीच्या 5,12,400 /- रुपये किंमतीच्या सिलबंद दारुच्या बाटल्या व इनोव्हा कार असा एकुण 14,12,400/- रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
छापा कारवाईवेळी मिळुन आलेल्या इनोव्हा कारचा मालक व अज्ञात चालक आरोपीचा शोध घेणेकरीता चंदगड पोलीस ठाणेकडील विशेष तपास पथक स्थापण केले असुन त्यांचा शोध सुरु आहे. पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुध्द चंदगड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती शीतल धविले, पोलीस उप निरीक्षक या करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत साो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील साो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. रामदास इंगवले सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पाटील, पोहवा /970 तुकाराम राजीगरे, पोहवा /782 सुनिल माळी, पोशि/391 ईश्वर नावलगी पोशि/1829 नितीन पाटील, पोशि/513 आशितोष शिऊडकर नेम- चंदगड पोलीस ठाणे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com