लोणी काळभोर पोलीसांनी अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा आरोपी मुबारक गड्डे घेतले ताब्यात…

सह संपादक- रणजित मस्के
पुणे :-२,७८,०००/- रु चा मुद्देमाल जप्त.
लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांनी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर घडक कारवाई मोहिम सुरु केली आहे.

या मोहिमे दरम्यान दि.२०/०२/२०२५ रोजी पहाटे ०५/०० वा.चे सुमारास १२ फाटा, पुणे सोलापुर माहामार्ग, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे या ठिकाणी सार्वजनीक रोडवरुन अवैध गावठी दारुचे कॅन्ड पुण्याचे दिशेने वाहुन नेले जात असल्याची बातमी प्राप्त
झाली.
त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पो.उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस अमंलदर गाडे, कर्डीले यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अवैध गावठी दारु वाहून नेली जाणारी चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार पकडली. त्या गाडीमध्ये लोणी काळभोर पोलीसांना हातभट्टी गावठी दारु भरलेली एकुण ८ कॅन्ड, २८० लीटर दारु मिळुन आली सदर कारवाई दरम्यान अवैध गावठी हातभट्टी दारुचे कॅन्ड वाहून नेणारे इसम नामे मुबारक जाफर गड्डे वय ४३ रा. पाषाणकर गॅस एजन्सीजवळ, लोणी काळभोर, पुणे वास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधि.क.६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर कारवाई दरम्यान आरोपीं कडुन एकुण २,७८,०००/-रुपचे किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणेचे श्री. राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस अमंलदार गाडे, कर्डीले यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com