काळेपडळ पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांची प्रतिबंधित गुटखा आरोपींवर छापा कारवाई

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :– एकुण ७६,४४,६५०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आरोपी कडुन जप्त.

अन्न व औषध प्रसासन विभाग पुणे येथील गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना प्राप्त माहिती वरुन, काळेपडळ पोलीस ठाणे कडील पथक असे संयुक्तरित्या वडाचीवाडी रोड घुले बस्ती उंड्री पुणे येथील गोडावुन वर जावुन, छापा टाकला असता, सदर गोडावुन मध्ये विविध माल वाहतुक गाडया मध्ये विविध बँडचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु व पानमसाला गुटखा मोठ्या प्रमाणात मिळून आल्याने, सदर ठिकाणी हजर असलेल्या इसम नामे संपतराज पेमाराम चौहान वय ३८ रा.इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे, कोंढवा पुणे यास ताब्यात घेवुन, प्रतिबंधित माला बाबत चौकशी करुन, त्यांचे कडुन ६४,४४,६५०/-रूपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व १२,००,०००/-रुपये किंमतीचे ४ पिकअप गाड्या असा एकुण ७६,४४,६५०/-रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने, अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार अंबादास उनवणे अन्न व औषध प्रशासन, विभाग पुणे यांनी आरोपी नामे संपतराज चौहान व इतर पाहीजे आरोपी याचे विरोधात काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजि.नं.२७/२०२५ भा. न्या. संहिता कलम १२३,२७४,२७५,२२३,३ (५), अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i), २६(२)(ii),२६(२)(iv),२७ (३)(e) ३० (२) (a) नियमन ३.१७, नियमन २.३.४,५९ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी नामे १) संपतराज पेमाराम चौहान वय ३८ रा. इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे, कोंढवा पुणे यास अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक, अनिल निबांळकर करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे. श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, यांचे सुचने प्रमाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे, पोलीस अमंलदार जाधव, पाटील, तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग कडील अन्न सुरक्षा अधिकारी यांचे पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट