४७८ ग्रॅम सोने रिकव्हर करणाऱ्या मार्केट यार्ड पोलीसांवर होतोय कौतुकांचा वर्षाव..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, श्रीमती मनिषा पाटील, यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं १४७/२४ तसेच गु.र.नं.२६२/२०२३ या गुन्हयांचे तपास अधिकारी सपोनि/अम्वीनी पाटील व महिला पोलीस अंमलदार सिमा शेंडकर यांना सखोल तपास करणे बाबत सविस्तर सुचना देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते.

दिले आदेशाप्रमाणे सदर गुन्हयाचे नमुद तपासी अधिकारी यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार किरण जाधव, कौस्तुभ जाधव, प्रविण तायडे व मुद्देमाल कारकुन सहा. पोलीस अंमलदार अनपट व पोलीस अंमलदार नदाफ यांचे मदतीने दाखल गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हयातील अटक आरोपीतांकडून साधारन ४०,६२,०००/-रु किं.चे ४७८.१ ग्रॅम सोने रिकव्हर केले. तसेच सदरचा जप्त केलेला मुद्देमाल मा. न्यायालयाशी संबंधीत असलेली कायदेशीर कार्यवाही पूर्ण करुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना दि.१९/०२/२०२५ रोजी डॉ. श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचे हस्ते परत केला. सदर वेळी दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन पोलीसांच्या कामगीरीचे कौतुक करुन आभार व्यक्त केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट