कराड मधील अंमली पदार्थ विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाची कारवाई दोन परदेशी नागरिकांसह एकुण १२ आरोपी अटक….

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

कराड :-सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्हयामध्ये अंमली पदार्थ विरुध्द कारवाईची मोहिम अधिक तीव्र केली आहे. सदर मोहिमेअंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कराड उपविभागामध्ये अंमलीपदार्थ कारवाई अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे एक पथक स्थापन केले होते. सुमारे १ महिना गोपनिय माहिती आणि तांत्रीक विश्लेषण केल्यानंतर कराड येथे सुरु असलेले गुंगीकारक आणि अंमली पदार्थाचे नेटवर्कची पाळेमुळे उध्वस्त करण्याच्या दृष्टीने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु केली होती. सदर कारवाईमध्ये सुरुवातीस कराड येथील ३ आरोपी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आणखी ४ पथके तयार करून त्यांना मुंबई, कोल्हापूर, पुणे तसेच इतर ठिकाणी पाठविण्यात आले. तपासामध्ये कराड मधील ड्रग्ज नेटवर्कची लिंक खुप दुरवर पोहोचल्याची लक्षात आले. त्याअनुषंगाने मुंबई येथून २ परदेशी नागरिकांना शिलाफिने अटक करण्यात आली व त्यांच्याकडून देखील ड्रग्ज जप्त करण्यात आले.

आतापर्यंत सदर तपासामध्ये विविध ठिकाणाहून एकुण १२ आरोपी यांना अटक करण्यात आलेली असून त्यांची नावे १) राहूल अरुण बडे, २) समिर उर्फ सॅम जावेद शेख, ३) तौसिब चाँदसो बारगिर, ४) संतोष अशोक दोडमणी, ५) फैज दिलावर मोमिन, ६) अमित अशोक घरत, ७) दिपक सुभाष सुर्यवंशी, ८) बेंझामिन अॅना कोरु, (आफ्रिकन खंड) ९) रोहित प्रफुल्ल शहा, १०) सागना इमॅन्युअल, (सेनेगल देश) ११) नयन दिलीप मागाडे, १२) प्रसाद सुनिल देवरुखकर अशी असून त्यांच्याकडून आतापर्यंत ३७ ग्रॅम गुंगीकारक एम.डी (मेफेड्रोन) ड्रग्ज एकुण ११४.३५०/-रु किंमतीचे जप्त करण्यात आलेले आहे. सदर कारवाईमध्ये डेटा अॅनालिसीस व गोपनिय यंत्रणा यांचा परिणामकारक वापर केला गेला आहे. एम.डी (मेफेड्रोन) ड्रग्ज विरोधात सातारा जिल्हयातील ही पहिलीच कारवाई असून यामुळे नशामुक्त जिल्हा या संकल्पनेला बळ मिळालेले आहे. सदर कारवाईची व्याप्ती वाढलेली असून त्यावर वेगाने तपास सुरू आहे.

सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमित बाबर, श्री. संतोष सपाटे, संताजी जाधव, असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयुर देशमुख, अनिकेत पवार, वैभय पवार, संग्राम भुताळे, राजाराम बाबर तसेच कराड शहर पोलीस ठाणेकडील बपोनि राजू ताशिलदार, सपोनि राजेश माळी, अशोक भापकर, निलेश तारु, पोउनि साक्षात्कार पाटील, सतिश आंचलवार, दिपक वागळे, पोलीस अंमलदार श्री. अनिल स्वामी, संग्राम पाटील, उंब्रज पोलीस ठाणेकडील सपोनि श्री. रविंद्र भोरे, पोलीस अंमलदार मयूर थोरात, सायबर पोलीस ठाणेचे महेश पवार, यशवंत घाडगे, प्रशांत मोरे, ओमकार डुबल, रामदास भास्करवाड, रणजीत कुंभार, रेश्मा तांबोळी यांनी सहभाग

घेतला. सदर प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पो.ना. सागर बर्गे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे. सदर कारवाईमध्ये शहरामध्ये चालणाऱ्या ड्रग्ज नेटवर्कला चांगलाच दणका बसला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिला आहे, नागरिकांनी देखील याबाबत माहिती असल्यास स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि पोलीसांना देखील सहकार्य करण्याचे आवाहन केलेले आहे. मा.पोलीस अधीक्षक समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कळूकर यांनी सर्व पोलीस टिमचे विशेष अभिनंदन केलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट