६८ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा रांची झारखंड येथे संपन्न..

0
WhatsApp Image 2025-02-16 at 9.58.49 PM (3)
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

रांची :– हा कर्तव्य मेळावा दि. १०/०२/२०२५ ते दि. १५/०२/२०२५ रोजी रांची, झारखंड येथे संपन्न झाला असून त्यामध्ये संपूर्ण देशातुन १८ राज्य, २ केद्रशासित प्रदेश व २ युनिट या संघानी सहभाग नोंदविला होता, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने ५१ पोलीस अधिकारी अंमलदार, ७ श्वान व सहभागी झाले होते.


या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने ४ पदकांची कमाई केली आहे. तसेच पोलीस व्हिडीओग्राफी या स्पर्धामध्ये Running Trophy प्राप्त केली आहे. सदर बक्षीस वितरण सोहळा रांची, झारखंड येथे माननीय वाणिज्य व संसदीय कार्यमंत्री राधाकृष्ण किशोर यांच्या शुभहस्ते पार पडला.

पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे धर्तीवर सन २००२ पासून महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. सदर मेळाव्यामध्ये १) सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन (विज्ञान शास्वाची तपासास मदत) २) घातपात विरोधी तपासणी स्पर्धा ३) संगणक स्पर्धा ४) पोलीस फोटोग्राफी ५) पोलीस व्हिडिओग्राफी ६) श्वान स्पर्धा अशाप्रकारे स्पर्धा घेवून त्यामधील पदक प्राप्त विजेत्या स्पर्धकांचे दि. ०१/०१/२०२५ पासून ते दि. ०५/०२/२०२५ रोजी पर्यंत विशेष प्रशिक्षण व सराव शिबीर हे गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, रामटेकडी पुणे येथे आयोजित करण्यात आले होते, प्रशिक्षणा दरम्यान घेण्यात आलेल्या निवड चाचणीच्या आधारे अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या करिता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाची निवड करण्यात आली. ६८ व्या पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पोलीस संघाने खालीलप्रमाणे एकुण २ सुवर्णपदक, १ रजत पदके व १ कांस्यपदके असे एकुण ४ पदके मिळवून विशेष कामगिरी केली आहे.

अ) सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन वा स्पर्धेमधील स्पर्धा उप प्रकार-

१. Scene of Crime Photography यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धक श्री राहुल नळकांडे, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक- नाशिक शहर यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

ब) Police Photography यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धक श्री. युगराज पुजारी, पोलीस शिपाई, नेमणूक- एस आर पी एफ ग्रुप २ यांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे.

क) Anti sabotage check या स्पर्धेमधील उप स्पर्धा प्रकार

१. Ground Search या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने व्दितीय क्रमांक मिळवला आहे.

ड) श्वान स्पर्धा या स्पर्धेमधील उप स्पर्धा प्रकार

बॉम्ब शोधक-या स्पर्धेमध्ये श्वान नामे सुर्या व श्वान हस्तक निलेश दयाळ, नेमणुक कोल्हापुर परिक्षेत्र यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

3) Police Videography यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धक श्री. दादा किसन गोरे, पोलीस नाईक, नेमणूक- एस आर पी एफ ग्रुप २ यांना रजतपदक (सिल्वर पदक) प्राप्त झाले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट