गोंदिया पोलीसांची हातभट्टी दारू निर्मिती/ विक्री करणाऱ्या धोकादायक गुंडाविरुद्ध “M.P.D.A.” कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई

सह संपादक- रणजित मस्के
गोंदिया
जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी, मा. श्री. प्रजित नायर, यांचे दिनांक- 14 फेब्रुवारी 2025 रोजीचे एम.पी. डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाईचे स्थानबध्दतेचे आदेश..
🔴 पोलीस ठाणे- गोंदिया ग्रामीण हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे- राहुल भजनदास गेडाम वय 25 वर्षे राहणार- आसोली, तालुका- जिल्हा- गोंदिया यास एका वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथे केले स्थानबद्ध-
⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर MPDA (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत..
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण चे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उप- अधीक्षक श्री . समीर महेर यांनी पो. ठाणे- गोंदिया ग्रामीण हद्दीतील मौजा- आसोली येथील राहणारा धोकादायक गुंड ईसंम नामे- राहुल भजनदास गेडाम वय 25 याचेविरुद्ध एम. पी. डी. ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यानुसार प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम यांचे मार्फतीने मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांना पाठवला होता..... आणि सदरचा MPDA प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील प्रतिबंधक सेल द्वारे तयार करून मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना मंजुरीकरीता सादर करण्यात आले होते..
❇️ मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया श्री. प्रजित नायर, यांनी प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंडा इसमाविरूद्ध एम. पी. डी. ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्याचे कलम 3(1) अन्वये दिनांक- 14/02/2025 रोजी चे आदेश्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे…
🔴 एम. पी. डी. ए.(MPDA) कायद्या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन- गोंदिया ग्रामीण हद्दीतील अट्टल सराईत धोकादायक गुंड ईसंम नामे – राहुल गेडाम याच्याविरुद्ध MPDA कायादयाअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे… आज दिनांक- 15/02/2025 रोजी नमूद गुन्हेगारास मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर जिल्हा – चंद्रपूर येथे एका वर्षाकरीता दाखल, स्थानबद्ध करण्यात येत आहे..
🔴 राहुल भजनदास गेडाम वय 25 वर्षे राहणार- आसोली, या धोकादायक गुंडाविरूध्द* हातभट्टी दारू निर्मिती चे, विक्रीचे गुन्ह्याची नोंद आहेत….त्याचेवर वारंवार कारवाई करून सुद्धा त्याचे चरित्रात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही… त्याचे वागण्यामुळे जनसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
⏩ सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक श्री. समीर महेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे मार्गदर्शनात प्रतिबंधक सेल चे म.पो.उप.नि. वनिता सायकर, पोलीस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांनी व पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण चे पोलीस अंमलदार यांनी कार्यवाही पार पाडली...
🔴 काय आहे (MPDA) एम.पी.डी.ए. कायदा?👇
👉 महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबत अधिनियम-1981 म्हणजेच एम पी. डी. ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी) होय…. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एम. पी. डी.ए. ची कारवाई करता येते… या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते….
जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सराईत गुन्हेगारांवर करण्यात येत असलेल्या एम.पी.डी.ए कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली असून त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत...