घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीकडुन तीन गुन्हे लोणी काळभोर पोलीसानी केले उघडकीस..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ६९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ च कलम ३३१ (१),३३१(४),३०५ मधील फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन दि. २९/०१/२०२५ रोजी फिर्यादी यांचे प्लॉट नं ५२४, रेल्वेकोलस वस्ती रोड, तरडे ता हवेली जि.पुणे येथील राहत्या घरात कोणीही नसताना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे राहत्या घराचे दरवाजा कशाचे तरी सहाय्याने उघडुन आतमध्ये प्रवेश करुन घरातील मास्टर बेडरुममधील बेडच्या फरशीचे खाली खड्डा खोदुन तयार केलेल्या तिजोरीमधील स्टिलच्या डब्यातील १४,७२०००/- सोन्याचे दागिणे, चांदीच्या वीटा व २,०००/- रु किं.चा हिकव्हीजन कंपनीचीडी व्ही आर चराफोडी चोरी झालेबाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.दिनांक ०७/०२/२०२५ रोजी तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे सदर गुन्हयाचे अनुषंगाने पेट्रोलींग करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अनिल जाधव यांना मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी, वय ४५ वर्षे, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेस मंगल कार्यालया शेजारी, थेऊरकोलवडी रोड, थेऊर, ता. हवेली, जि.पुणे यास वृंदावन पॅलेस मंगल कार्यालया शेजारुन थेऊर पुणे येथुन ताब्यात घेवुन अटक करुन त्याचेकडुन दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले ९५.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व एक किलो वजनाची चांदीची वीट असा एकुण ९,५०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.नमुद आरोपीकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकिस आणण्यात आलेले आहेत.१. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ५६२/२०२४ मा.न्या. सं. क. ३३१(४), ३०५२. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ५६/२०२५ भा. न्या. से. क. ३३१ (४), ३०५३. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ६९/२०२५ भा. न्या. सं. क. ३३१ (१),३३१ (४),३०५सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विनान पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, भा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि अनिल जाधव, पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, सुनिल नागलोत, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदिप गाडे, चक्रधर शिरगीरे यांचे पथकाने केली आहे.