डहाणू तालुक्यात नरपड या गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारावर पालघर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध…!

0
IMG-20250214-WA0015
Spread the love

प्रतिनिधी : संदेश मोरे

पालघर.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात नरपड या गावातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार या निंदनीय घटनेचा पालघर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. सदर खटला सरकार कडून फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व गुन्हेगारास लवकरात लवकर फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी जिल्ह्यामार्फत पक्षाच्या वतीने मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पालघर जिल्हाधिकारी मा. गोविंद बोडके यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हा प्रभारी मा. सुप्रेश खैरे, जिल्हा अध्यक्ष मा.शिवविलास सोनकांबळे, महानगर पालिका वसई विरार क्षेत्र च्या उपाध्यक्षा मा.प्रेरणाताई भेकरे, बोईसर शहर सचिव आयु. सचिन भोसले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट