नवी मुंबई पोलीसांनी १ कोटी १० लाखाचे कोकेन, एमडी पावडर व रोख रक्कम सह ३ आफ्रिकन नागरीकांना केली अटक..

.नवी मुंबई


सह संपादक- रणजित मस्के नवी मुंबई पोलिसांनी तीन आफ्रिकन नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी दहा लाखाचा आमली पदार्थ जप्त केला आहे. एकूण 11 ठिकाणी छापा टाकून 59 लाख 24 हजार रूपयांची उच्च प्रतीचे कोकेन , 50 लाख 42 हजाराची एमडी पावडर , शिवाय 43 हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम एक कोटी दहा हजाराचा माल जप्त केलाय. ही कारवाई करताना एकूण पस्तीस आफ्रिकन नागरिकांची चौकशी करण्यात आली .