१० लाख किंमतीच्या २५ दुचाकी चोरणारा शंकर देवकुळे पुणे गुन्हे शाखा -३ च्या ताब्यात

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे पर्वती पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४३०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) हया दाखल गुन्हयाचा समांतर तपास मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते हे करीत असताना दाखल गुन्हयाचे घटनास्थळी मिळाले सीसीटिव्ही फुटेजवरून दाखल गुन्हयातील मोटर सायकल चोरणारा आरोपी हा शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, रा. मेमाने वस्ती, उरूळी देवाची, पुणे हा पोलीस अभिलेखावरील सराईत मोटरसायकल चोर असल्याचे निष्पन्न झालेने.त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण करून नमुद आरोपीस इचलकरंजी, कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात असे निष्पन्न झाले की, त्याने मागिल ०५ महिन्यांचे कालावधीत जेलमधून सुटल्यानंतर पुणे शहर परीसरातुन दुचाकी वाहने चोरी करून नमुद गाडयांच्या नंबरप्लेट काढून टाकून सदरच्या गाडया त्याचे ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनिल कुदळे, वय २७ वर्षे, रा.मु. पो. खडकी, ता. दौंड, जि. पुणे वास त्याचे मैरवनाथ गॅरेज मु.पो. खडकी, ता. दौंड, जि. पुणे येथे विक्री करीता नेवून देत होता तसेच शंकर देवकुळे याचा तुळजापुर येथील मित्र याचेकडे ठेवण्याकरीता दिलेल्या ०२ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच शंकर देवकुळे याचे ओळखीचा इसम रा. दौंड, जि. पुणे यास विकलेली ०१ दुचाकी व त्याचेकडे विक्रीकरीता ठेवलेल्या ०४ दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी एकुण २५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. सदर वाहनांबाबत पुणे शहरात व इतर ठिकाणी वाहने चोरीचे एकुण १८ गुन्हे नोंद असून उर्वतरी ०७ वाहनांचे मालकांचा शोध सुरू आहे.आरोपी शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे ५० पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे नोंद आहेत. तसेच मेट्रो स्टेशन जवळ व सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाडयांचे लॉक जुने झाले आहे अशा दुचाकी हेरून डुप्लीकेट चावी वापरून त्या चोरी करून घेवून जात होता. तसेच शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुदळे याला सांगत होता की, “मी फायनान्स कंपनीत कामाला असून हप्ते न भरलेल्या गाड्या ओढून आणतो.” त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता. अनिकेत हा कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे यास साथ देवून त्या दुचाकी वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर ग्राईंडरने खराब करून त्या दुचाकी गावामधील शेतक-यांना व गरजुंना कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकत होता.सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर श्री. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, सपोफौ मधुकर तुपसौंदर, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजिव कळंबे, सुजित पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट